(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CBI : आयकर विभागाची फसवणूक, नौदलाच्या 18 कर्मचाऱ्यांसह 31 जणांवर CBI कडून गुन्हा दाखल
CBI : आयकर विभागाची (Income Tax Department) फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने नौदलाच्या (Indian Navy) 18 कर्मचार्यांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
CBI : आयकर विभागाची (Income Tax Department) फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील (Kerala) कन्नूर इथे केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने भारतीय नौदलाच्या (Indian Navy) 18 कर्मचार्यांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये केरळ पोलीस दलातील (Kerala Police) दोन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सुमारे 44 लाख रुपयांपेक्षा जास्त आयकराचे खोटे रिफंड क्लेम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Kerala News : केरळचे मुख्य आयकर आयुक्त टी एम सुगंथामाला यांच्या तक्रारीवरुन कारवाई
आयकराचे खोटे रिफंड क्लेमचे दावे करण्यासाठी नौदलाच्या कर्मचाऱ्यांसह, पोलीस कर्मचारी आणि दोन खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एजंट आयकर रिफंडातील 10 टक्के वाटा शुल्क म्हणून घेत होते. सीबीआयची ही कारवाई केरळचे मुख्य आयकर आयुक्त टी एम सुगंथामाला यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली आहे. सीबीआयने आयपीसी कलम 420 (फसवणूक), 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कन्नूरमधील अनेक नोकरदार व्यक्ती 2016-17 पासून बोगस रिफंडचा दावा करत आहेत. काही एजंट त्यांच्यापैकी काहींसाठी 10 टक्के परतावा रक्कम फी म्हणून जमा करुन आयकर रिटर्न भरत आहेत.
एजंटच्या संगनमताने आयकर परताव्याचा खोटा दावा
हे लोक फॉर्म-16 मध्ये समाविष्ट नसलेल्या विविध बोगस परताव्याचा दावा करत होते. मात्र, त्यांनी केलेले दावे चुकीचे आहेत. आयुक्त टी एम सुगंथामाला यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 51 पगारदार लोकांनी काही विशिष्ट एजंटांच्या संगनमताने आयकर परताव्याचा खोटा दावा केला आहे. 51 करनिर्धारकांपैकी, ज्यांना आयकर परतावा मिळाला होता अशा 20 व्यक्तींनी त्यांना नोटीस बजावल्यानंतर विभागाला 24.62 लाख रुपये परत केले आहेत. त्यांनी देखील कबूल केले की आयकर परताव्याचा दावा करण्यात त्यांनी चूक केली आहे. अशा प्रकारची माहिती एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे 18 कर्मचारी आणि केरळ पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांसह 31 कर्मचाऱ्यांनी खोटे दावे केले होते. त्यांना प्राप्तीकर परतावा मिळाला होता. त्यांनी अद्याप आयकर विभागाला 44 लाख रुपये दिलेले नाहीत. खोटे दावे करत हे पैसे त्यांनी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: