एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

1,76,000 कोटींच्या ‘2G’ घोटाळ्यावर CBI कोर्टात आज फैसला

ए राजा आणि कनिमोझी आता जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सीबीआयने एप्रिल 2011 मध्ये कोर्टात जवळपास 80 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपपत्रात 125 सक्षीदार आणि 654 कागदपत्रांचा समावेश केला होता.

नवी दिल्ली : 2010 साली झालेल्या 2G घोटाळ्याबाबत सीबीआय कोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. 2G मुळे देशाला 1 लाख 76 हजार कोटींचा नुकसान सोसावा लागला. या घोटाळ्यात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या माजी खासदार कनिमोझी यांना तुरुंगातही जावं लागलं. या दोघांसह अनेक कंपन्या आणि व्यावसायिकांवरही या घोटाळ्याप्रकरणी आरोप आहेत. 2G स्पेक्ट्रम घोटाळा पहिल्यांदा 2010 साली समोर आला होता. टूजी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे 1 लाख 76 हजार कोटींचं नुकसान देशाला सोसावा लागल्याचा दावा सीएजी रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा रिपोर्ट 2010 मध्ये आला  होता. 2G घोटाळ्याशी संबधित तीन प्रकरणं कोर्टात प्रलंबित आहेत. तिन्ही प्रकरणांवर निर्णय येण्याचे बाकी आहे. यामधील दोन याचिका सीबीआयने दाखल केल्या होत्या, तर एक अंमलबजावणी संचलनालयने दाखल केली होती. ए राजा दूरसंचार मंत्री असताना शाहिद बलवा यांच्या स्वान टेलिकॉम कंपनीला नियमांना केराची टोपली दाखवत टूजी लायसन्स दिल्याचे आरोप आहे. डीएमकेच्या माजी खासदार कनिमोझींवर काय आरोप आहेत? डीएमकेच्या माजी खासदार कनिमोझी ज्यावेळी ककलाईंगर टीव्हीच्या संचालक होत्या, त्यावेळी टूजी स्पेक्ट्रम वाटपाच्या बदल्यात डीबी ग्रुपने कलाईंगर टीव्हीला 200 कोटी रुपयांची लाच दिली. ए राजा यांनी मनमानी पद्धतीने स्पेक्ट्रम वाटप केल्याने सरकारला 1 लाख 76 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. 2G स्पेक्ट्रमचे 122 लायसन्स रद्द टूजी स्पेक्ट्रम वाटपात आपण कोणत्याही प्रकारचा घोटाळा केला नसल्याचंच ए राजा कायम म्हणत होते. मात्र 2012 साली सुप्रीम कोर्टाने ए राजा यांच्या कार्यकाळातील टूजी स्पेक्ट्रमचे सर्व म्हणजे 122 लायसन्स रद्द केले. त्यामुळे ए राजा यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या. सीबीआय कोर्टाने ऑक्टोबर 2011 मध्ये आरोपींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रं बनवणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, सरकारी पदाचा दुरुपयोग, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार असा कलमाअंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यामुळे या घोटाळ्यात जे दोषी ठरतील, त्यांना 6 महिने ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आयपीसी कलम 409 अन्वये, जर या घोटाळ्यात कुणी दोषी आढळला, तर त्याला जन्मठेप भोगावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील आरोपींच्या समोरील अडचणी येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ए राजा आणि कनिमोझी आता जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सीबीआयने एप्रिल 2011 मध्ये कोर्टात जवळपास 80 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपपत्रात 125 सक्षीदार आणि 654 कागदपत्रांचा समावेश केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget