एक्स्प्लोर
100 रुपये आणि एक प्लेट बिर्याणीसाठी तिने 42 बसेस पेटवल्या
बंगळुरु : कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रचंड धुसफूस सुरुच आहे. गेल्या आठवड्यात एकाच डेपोतील तब्बल 42 बस पेटवण्यात आल्या होत्या. या बस पेटवणारी 22 वर्षीय युवती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केवळ 100 रुपये आणि एक प्लेट बिर्याणीच्या मोबदल्यात आंदोलकांनी युवतीकडून हे काम केल्याचं म्हटलं जात आहे.
12 सप्टेंबरला भाग्या नावाच्या तरुणीला काही आंदोलकांनी 100 रुपये आणि एक प्लेट मटण बिर्याणी खाऊ घालण्याचं आमिष दाखवलं. 22 वर्षीय भाग्याची आई येलम्मा यांनी ही माहिती दिली आहे. 'डीएनए' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर भाग्यानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज बांधला आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कावेरी प्रश्नी उफाळलेल्या हिंसाचारानंतर अटक झालेल्या 400 जणांपैकी भाग्या ही एकमेव महिला आहे. आंदोलनाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर महिला दिसत असल्या, तरी त्यांचा सहभाग निश्चित न झाल्यामुळे त्यांना अटक झालेली नाही.
पुढचे 10 दिवस दररोज तामिळनाडूला 12 हजार क्युसेक्स पाणी सोडा, असे आदेश 12 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं कर्नाटकला दिले होते. या आदेशविरोधात 12 तारखेला दिवसभर बंगळुरु, म्हैसूरसह इतर शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचं सत्र पाहायला मिळालं. ज्यात तामिळनाडूच्या शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. तामिळनाडूच्या अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली.
प्रशासनाने तणाव निवळण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिसांना रस्त्यावर उतरवलं आहे. बंगळुरुत 16 पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
काय आहे कावेरीच्या पाण्याचा वाद?
*कावेरी नदीचा उगम कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील आहे. पुढे ही नदी वाहात तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीतून बंगालच्या उपसागराला मिळते
*1892 आणि 1924 मध्ये म्हैसूर आणि मद्रास प्रांतात झालेल्या पाणीवाटप करारावरुन वादाला तोंड
*1990 साली सुप्रीम कोर्टानं कावेरी ट्रिब्युनलकडे वाद सोपवला, 1991 ला तामिळनाडूला 205 टीएमसी पाणी तामिळनाडूला देण्यास सांगितलं.
*2007 मध्ये ट्रिब्युनलनं तामिळनाडूला 419 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला, वर्षात 10 वेळा हे पाणी सोडण्याची सूचना
*यंदा कमी पाऊस झाल्यानं कावेरी निम्मं रिकामं असल्याचं कारण देत कर्नाटकानं पाणी सोडण्यास विरोध केला
*तर 40 हजार हेक्टरवरचं सांबा पीक वाचवायचं असेल तर तामिळनाडूला पाणी सोडणं गरजेचं असल्याचा दावा जयललितांनी केला
*5 सप्टेंबर 2016 - सुप्रीम कोर्टानं 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्यावरुन जाळपोळ, बंद, धरणं आंदोलनं सुरु झाली
*9 सप्टेंबर 2016 - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहिलं, कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्नगं भीर होईल
*12 सप्टेबर 2016 - कर्नाटकच्या विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं 10 दिवस 15 हजाराऐवजी 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले
संबंधित बातम्या
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कावेरीचा पाणी प्रश्न कायम
कावेरीचं पाणी पेटलं, 56 बस जाळल्या, 16 ठिकाणी कर्फ्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement