एक्स्प्लोर
कास्टिंग काऊच: महिला खासदारही सुटलेल्या नाहीत: रेणुका चौधरी
कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
नवी दिल्ली: कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेत्या आणि राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असं रेणुका चौधरी म्हणाल्या.
सरोज खान काय म्हणाल्या?
"फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते," असं म्हणत सरोज खान यांनी एकप्रकारे कास्टिंग काऊचचं समर्थन केलं. त्या सांगलीत बोलत होत्या.
“हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी देते, बलात्कार करुन सोडून देत नाही
हे मुलीवर आहे की, तिला काय करायचंय. तिला त्याच्या हाती लागायचं नाही तर नाही येणार. तिच्याकडे कला आहे तर तिने स्वत:ला का विकावं? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची आई-बाप आहे.”
सरोज खान यांचा माफीनामा
दरम्यान, आपल्या या विधानावर सरोज खान यांनी माफीही मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असं त्यांनी म्हटलं.
दक्षिण भारतातील स्ट्रगलर अभिनेत्री श्री रेड्डीच्या आरोपांनंतर भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचवर जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनीही त्यांच्यासोबत कास्टिंग काऊच झाल्याचं सांगितलं.
तेलुगू अभिनेत्रीचं अर्धनग्न आंदोलन
तेलुगू फिल्म इंड्रस्टीमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चित्रपटसृष्टीतील काळं सत्य समोर आणलं. या अभिनेत्रीने आंदोलनाद्वारे तेलुगू फिल्म इंड्रस्टीमधील कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला वाचा फोडली होती.
त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या
नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन
कास्टिंग काऊचविरुद्ध अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस होऊन आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement