एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमरिंदर सिंहांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद नाही?
चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांना काय मिळणार, याची चर्चा सध्या रंगली आहे.
सिद्धूंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा आहे. मात्र खुद्द मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि पंजाबच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीच या विषयावर मौन बाळगलं आहे.
अमरिंदर सिंह आणि सिद्धू दोघेही पटियालामध्येच राहतात, ही देखील सिद्धूंसाठी एक अडचण ठरु शकते, असं सांगितलं जात आहे. शिवाय अमरिंदर सिंहांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसेल, अशीही माहिती आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसने 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी सिद्धूंनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी ते अमृतसह पूर्वमधून आमदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement