एक्स्प्लोर

उमेदवाराला स्वतःवरील गुन्हे निवडणुकीपूर्वी टीव्ही, वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावे लागणार

गुन्हेगारीच्या आरोपावरुन उमेदवाराला अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने मंगळवारी हा निर्णय दिला.

नवी दिल्ली : निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने स्वतःवर दाखल असलेले गुन्हे निवडणूक आयोगाने दिलेल्या नामांकन अर्जावर नमूद करावेत, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सोबतच सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज भरल्यानंतर किमान तीन वेळा माध्यमात आपल्यावर दाखल असलेले गुन्हे प्रसिद्ध करावेत. राजकीय पक्षांनीही आपल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी पक्षाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असाही आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. निवडणूक आयोग नवीन फॉरमॅट तयार करणार काही वृत्तांनुसार, निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचं पालन पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये करणार आहे. म्हणजे जो उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार असेल, त्याला स्वतःवर दाखल असलेले गुन्हे वृत्त वाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावे लागतील. हे सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग एक नवीन फॉरमॅट तयार करणार आहे. सध्याचा नियम काय आहे? उमेदवार निवडणूक अर्ज भरताना सध्या सर्व गुन्हे, संपत्ती आणि इतर माहिती एकाच फॉरमॅटमध्ये देतात. निवडणूक आयोगाकडून ही माहिती वेबसाईटवर अपलोड केली जायची. पण आता राजकीय पक्षांनाही ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागेल. शिवाय माध्यमांमध्येही उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्ध होईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर राजकीय पक्षांची प्रतिक्रिया गुन्हेगारी नोंद सार्वजनिक पद्धतीने मीडियात तीन वेळा प्रसिद्ध करण्याबाबत राजकीय पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'शी बोलताना काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''गुन्हेगारी माहिती देण्याबाबत मी सहमत आहे. पण जाहिरात देण्याबाबत मी सहमत नाही.'' तर निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी हा सध्या सर्वात चांगला पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget