एक्स्प्लोर
Advertisement
वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जुन्या नोटांबाबत वटहुकूम जारी करण्यात आला आहे. 30 डिसेंबरनंतर हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जवळ बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे. जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुभा देण्यात आली आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरबीआय नवनवीन नियम, निर्णय जाहीर करत आहे. त्यामुळे नागरिकांना रोज नव्या नियमाने नोटाबंदीला सामोरं जावं लागत आहे. त्यात 30 डिसेंबरला जुन्या नोटा जमा करण्याची मुदतही संपते आहे. त्यामुळे केंद्र सरकार नवीन कोणता नियम लागू करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement