एक्स्प्लोर
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला मंजुरी देण्यात आली. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. घर भाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनाच्या 60 टक्के इतका असतो. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल.
केंद्र सरकारनं वेतनवाढ जाहीर केल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आज भत्तेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या 1 जुलैपासून या सुधारणांची अंमलबजावणी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement