एक्स्प्लोर
CA Exam Postponed : CA चा पेपर पुढे ढकलला, आता 'या' दिवशी होणार परीक्षा
अपरिहार्य परिस्थितीमुळे चार्टर्ड अकाउंट्स फाऊंडेशन परीक्षा पेपर-1 (CA) पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने दिली आहे.
ICAI Postpones CA Foundation Exam Paper One: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने उद्या होणारा (8 डिसेंबर) चार्टर्ड अकाउंट्स फाऊंडेशन परीक्षा पेपर-1 काही कारणास्तव पुढे ढकलला आहे. ही परीक्षा दुपारी दोन ते पाच दरम्यान घेण्यात येणार होती, जी आता होणार नाही. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
उद्या होणार ही परीक्षा त्याच ठिकाणी आणि त्याचवेळी 13 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. प्रिन्सिपल्स अँड अकाउंटिंगचा सराव नावाचा पेपर उद्या होणार होता.Institute of Chartered Accountants of India postpones Chartered Accountants Foundation Examination paper-1 that was scheduled to be held tomorrow to 13th December due to 'unavoidable circumstances'. pic.twitter.com/fSB5QvhnkK
— ANI (@ANI) December 7, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement