(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP C-Voter Survey : योगी युपीचा गड राखणार की अखिलेश चमत्कार करणार? पाहा सर्व्हे काय म्हणतोय
C-Voter Survey : उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांवर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?
ABP News C-Voter Survey : नव्या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांमुळे उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपासह इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीपासून काँग्रेस अन् मायावतींच्या बसपानेही विजयाचा दावा केलाय. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्ता राखणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हलचालींना वेग आलाय. अशातच एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेतलाय.
उत्तर प्रदेशमध्ये कुणाचं सरकार येईल? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोण मुख्यमंत्री होणार? सारखे प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आले. साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून एबीपीने मतदारांना उत्तर प्रदेशमध्ये कुणाचं सरकार येईल? मुख्यमंत्र्यासाठी कुणाला पसंती? यासारखे प्रश्न विचारलेत... पाहा काय म्हणतोय सर्व्हे....
युपीमध्ये कुणाला किती मतं?
भाजप - 40 टक्के
समाजवादी पार्टी - 34 टक्के
बसपा - 13 टक्के
काँग्रेस - 7 टक्के
इतर - 6 टक्के
उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांवर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?
भाजपा + 212-224
समाजवादी पार्टी+ 151-163
बसपा - 12-24
काँग्रेस- 2-10
इतर -2-6
पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये पाच राज्यातील 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. पाच राज्यातील 690 विधानसभा जागेवरील लोकांचा कौल जाणून घेतलाय. हा सर्व्हे 13 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान घेण्यात आला होता. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live