ABP-C Voter Survey : भाजप, काँग्रेस की आप, गोव्यात कुणाची येणार सत्ता?
ABP News C-Voter Survey : जसं जसं गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय.
ABP News C-Voter Survey : जसं जसं गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केजरीवालांचा आप तर ममताचा तृणमूलही आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. भाजप, काँग्रेससह तृणमृल काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय नेतेही गोवावारी करत आहेत. नुकतीच प्रियंका गांधी यांनी गोव्याला भेट दिली आहे. राज्यातील एकूणच राजकीय वातावरण तापलं आहे.
प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते विजयाचा दावा करताना दिसत आहेत. अशातच गोव्यातील लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूजने सी व्होटर सर्व्हेच्या माध्यमातून केलाय. गोव्यातील 40 विधानसभा जागांवरील मतदारांना काय वाटतेय? कुणाचं सरकार येईल? असा प्रश्न सर्व्हेच्या माध्यमातून विचारण्यात आलाय.
साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून एबीपीने मतदारांना गाव्यामध्ये कुणाचं सरकार येईल? असा प्रश्न विचारला होता. पाहा काय म्हणतोय सर्व्हे....
कुणाला किती मतं?
भाजप -30 टक्के
काँग्रेस-20 टक्के
आप-24 टक्के
अन्य - 26 टक्के
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप- 17-21
काँग्रेस- 4-8
आप- 5-9
अन्य - 6-10
पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये पाच राज्यातील 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. पाच राज्यातील 690 विधानसभा जागेवरील लोकांचा कौल जाणून घेतलाय. हा सर्व्हे 13 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान घेण्यात आला होता. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live