एक्स्प्लोर

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता, यंदा निकष काय, अर्ज कधी, कुठे भरायचा? सर्व माहिती

Presidential Election 2022 : प्रत्येक उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराची ज्या लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी आहे त्या मतदार यादीतील उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत असावी.

Presidential Election 2022 : देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, बैठकांना सुरुवात झाली आहे. आज, 16 जून रोजी तब्बल 11 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल देशभरात उत्सुकता शिगेला लागली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकष काय, अर्ज कधी, कुठे भरायचा? याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात.. 

भारतीय राजपत्रात बुधवारी (15 जून, 2022) प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, राष्ट्रपती निवडणूक, 2022 साठी खालील वेळापत्रक निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे...

29 जून 2022, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
30 जून 2022, उमेदवारी अर्जांची छाननी
2 जुलै 2022, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
18 जुलै 2022, आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल.

निवडणूक आयोगाने 13 जून, 2012 रोजी आणखी एक अधिसूचना जारी केली होती.  त्यानुसार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांची 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली. तर, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मुकुल पांडे आणि राज्यसभा सचिवालयातील मुख्य दक्षता अधिकारी तसेच संयुक्त सचिव सुरेंद्र कुमार त्रिपाठी यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 च्या नियम 3 अंतर्गत आवश्यक आहे त्यानुसार, निवडणूक अधिकारी यांनी 15 जून, 2022 रोजी जाहीर सूचनेद्वारे सूचित केले आहे की, उमेदवाराने किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकांनी किंवा समर्थनकर्त्यांद्वारे त्यांच्या कार्यालयात, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकडे किंवा तो अपरिहार्यपणे गैरहजर असल्यास सहायक निवडणूक अधिकारी, मुकुल पांडे, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) सुरेंद्र कुमार त्रिपाठी,  संयुक्त सचिव आणि मुख्य दक्षता अधिकारी, राज्यसभा सचिवालय, यांच्या कार्यालयात सकाळी 11  आणि दुपारी 3 दरम्यान (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) उमेदवारी 29 जून 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज पाठवू शकतो.

प्रत्येक उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराची ज्या लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी आहे त्या मतदार यादीतील उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत असावी.

प्रत्येक उमेदवाराने रुपये पंधरा हजार फक्त, इतकी रक्कम जमा करावी.  ही रक्कम निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज  सादर करताना रोख स्वरूपात जमा केली जाऊ शकते किंवा आधी भारतीय रिझर्व्ह बँकेत किंवा सरकारी कोषागारात जमा केली जाऊ शकते. तसे केले असल्यास नंतर ही रक्कम जमा झाल्याचे दर्शवणारी पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे;

वरील कार्यालयातून वर दिलेल्या वेळी उमेदवारी अर्ज मिळू शकतात..
कायद्याच्या कलम 5B च्या पोटकलम (4) अन्वये रद्द करण्यात आलेल्या  उमेदवारी अर्जांव्यतिरिक्त इतर अर्ज गुरूवार, 30 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता  समिती कक्ष क्रमांक 62, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे छाननीसाठी घेतले जाईल.
उमेदवाराने, किंवा त्याच्या प्रस्तावकांपैकी किंवा समर्थकांपैकी कोणीही, ज्यांना या निमित्त उमेदवाराने लिखित स्वरूपात अधिकृत केले आहे, उपरोक्त परिच्छेद (i) मध्ये निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींना 2 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नोटीस पाठवली जाऊ शकते.
निवडणूक घेण्याची आवश्यकता असल्यास, सोमवार, 18 जुलै 2022 रोजी सकाळी 10 आणि दुपारी 5 दरम्यान नियमानुसार निश्चित केलेल्या मतदानाच्या ठिकाणी मतदान घेण्यात येईल. 
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या राजपत्रांमध्ये या अधिसूचना आणि निवडणूक अधिकारी यांनी जारी केलेल्या सार्वजनिक सूचना एकाच वेळी प्रकाशित करण्याची व्यवस्था देखील केली आहे.

निवडणूक प्रक्रियेसंबंधी कोणत्याही शंकानिरसनासाठी,  पी. सी. मोदी, राष्ट्रपती निवडणूक, 2022 चे निवडणूक अधिकारी आणि राज्यसभा सरचिटणीस यांच्याशी त्यांच्या कार्यालयात (खोली क्रमांक 29, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली)

उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत म्हणजेच 18 जून 2022 पर्यंत (सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त) शनिवारसह सर्व कामकाजाच्या दिवशी दुपारी 3.30 ते 4.30 दरम्यान संपर्क साधता येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget