एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बुलेट ट्रेन म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय- माजी उपगव्हर्नर
नवी दिल्लीः प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा एकदम निरुपयोगी प्रकल्प आहे. भारताला बुलेट ट्रेनची सध्या कसलीही गरज नाही, त्यामुळे बुलेट ट्रेन म्हणजे पैशांचा निव्वळ अपव्यय आहे, असं वक्तव्य रिझर्व्ह माजी बँकेचे उपगव्हर्नर राकेश मोहन यांनी केलं आहे.
भारताला जर विकास साधायचा असेल तर योग्य क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तरच भारताचा विकास निर्देशांक 7 ते 9 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल, असं मोहन यांनी म्हटलं आहे.
गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन गव्हर्नरची निवड करण्यात येणार आहे. नवीन गव्हर्नरपदाच्या शर्यतीमध्ये राकेश मोहन यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेनचीच गरज नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement