एक्स्प्लोर

गाझियाबादमध्ये पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

दिल्लीत पावसामुळे आणखी एक इमारत कोसळली आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये खोडा परिसरात पाच मजली इमारत कोसळली.

नवी दिल्ली : दिल्लीत पावसामुळे आणखी एक इमारत कोसळली आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये खोडा परिसरात पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. शुक्रवारी रात्री उशिरा गाझियाबादमधील इमारत पत्त्यासारखी कोसळली. ही इमारत रहिवासी असल्याची माहिती आहे. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र इमारतीतील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. इमारत कोसळल्याचा आवाज इतका भयानक होता की आसपासच्या इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. इमारत दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसंच स्थानिक खासदार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान 10 दिवसांपूर्वी 17 जुलै रोजी ग्रेटर नोएडामध्ये एक चार मजली आणि बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत अशा दोन इमारती कोसळल्या होत्या. शाहबेरी परिसरात ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू होता असून 50 हून अधिकजण ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाले होते. दोन इमारतींपैकी एका इमारतीत 10 ते 12 कुटुंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. मंगळवारी रात्री परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भूकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget