एक्स्प्लोर
बजेट फेब्रुवारीतच, निवडणूक आयोगाचा विरोधीपक्षांना धक्का

नवी दिल्ली : निवडणुकांच्या काळात बजेट सादर करु नये, अशी मागणी करणाऱ्या विरोधीपक्षांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. अर्थसंकल्प फेब्रुवारीतच सादर होणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका होत नाहीत, तोवर केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये, या मागणीसाठी विरोधीपक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली होती. निवडणुकीच्या काळात बजेट सादर केल्यास नागरिक आश्वासनांना भुलून सरकारला मत देतील अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी बुधवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लावून धरली होती. मात्र शिवसेनेसह विरोधीपक्षांची निवडणूक आयोगाने घोर निराशा केली आहे. अर्थसंकल्प फेब्रुवारीतच सादर होणार असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं धक्का दिला आहे.
संबंधित बातम्या :
निवडणुकांपर्यंत बजेट मांडू देऊ नका, शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशन महिनाभर आधी, बजेट 1 फेब्रुवारीलाच
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















