Budget 2021 Speech LIVE Updates | अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका

Budget 2021 Live Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोनाच्या संकटातूनही तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 01 Feb 2021 06:39 PM

पार्श्वभूमी

Budget 2021 Live Update : अर्थात केंद्रीय अर्थसंकल्पाचीच चर्चा 2021 हे वर्ष सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. 29 जानेवारीपासून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. ज्यानंतर 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...More

देशातील प्रत्येक घटकांचा विचार करुन कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून देशाला उभे करण्यासाठी आज सादर झालेला देशाचा अर्थसंकल्प "सबका साथ सबका विकास" असाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत हेच आजच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.