एक्स्प्लोर
Budget 2019 | मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्स गडगडला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत सेन्सेक्स 137 अकांनी घसरला. विशेष म्हणजे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणआधी सेन्सेक्सने 40 हजारांचा आकडा गाठला होता.
![Budget 2019 | मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्स गडगडला Budget 2019 sensex and nifty down after Nirmala Sitharaman presents budget Budget 2019 | मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्स गडगडला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/05141708/makrert.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असतानाच सेन्सेक्स गडगडलेला पाहायला मिळाला. तर निफ्टीमध्येही घसरण झाली.
दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 137 अकांनी घसरुन 39,7171.01 वर स्थिर झाला. तर निफ्टी 44.60 अकांनी घसरुन 11,902.15 वर स्थिर झाला. विशेष म्हणजे अर्थसंकल्पाचे सादरीकरण होण्याच्या काही तास आधीच सेन्सेक्सने 40 हजारांचा आकडा गाठला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जोर दिला आहे. तसेच या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 3 अब्ज डॉलर होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी केला आहे. पाच वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचे आकार 1,850 अब्ज डॉलर्स एवढी होता. आता 2,700 अब्ज डॉलर्स एवढा असून येणाऱ्या काही वर्षात अर्थव्यवस्था 5000 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची क्षमता असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
Budget 2019 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हाती पेटाऱ्या ऐवजी 'लाल रंगाची बॅग' | ABP Majha
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
- पेट्रोल आणि डिझेल महागणार, प्रत्येकी 1 रुपयाचा अतिरिक्त सेस
- सोने आणि मौल्यवान धातूंही महागले उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के
- इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन करामध्ये दीड लाखांची सूट
- वार्षिक 2 ते 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के तर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के सरचार्ज
- वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असणाऱ्यांना कर द्यावा लागणार नाही, स्लॅबमध्ये बदल नाही, गुंतवणुकीवर मोठी सूट
- आयकर रिटर्न भरण्यासाठी आता आधार कार्डही पुरेसं, पॅन कार्डची सक्ती नाही
- बिझनेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी टीडीएस लागणार, बँकेतून एक कोटी रुपये काढल्यास दोन टक्के कर द्यावा लागणार
- घर खरेदी करणाऱ्यांसाठी गिफ्ट, गृहकर्जाच्या व्याजावर 3.5 लाख रुपयांपर्यंतच्या करावर सूट
- महिला केंद्रीत योजना बनवण्याचे प्रयत्न, 'नारी तू नारायणी', महिलांच्या विकासाठी मोदी सरकारचा नवा नारा
- हर घर जल योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सगळ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी, घरापर्यंत पाण्याचं कनेक्शन देणार
- अन्नदात्याला ऊर्जादाता करणार, कृषी आणि दूध उद्योगासाठी योजना आखणार
- देशात 2022 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधणार, प्रत्येक घराला वीज, गॅस, शौचालय देणार
- तीन कोटी दुकानदारांना पेंशन देण्याचा विचार, 59 मिनिटात छोट्या दुकानदारांना कर्ज देणार
- एक, दोन, पाच, दहा, वीस रुपयांचं नवं नाणं बाजारात येणार. अंध लोकांनाही सहज ओळखता यावीत अशा पद्धतीची ही नाणी असणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)