एक्स्प्लोर
Advertisement
जम्मू : पाकिस्तानच्या गोळीबारात BSF चा जवान शहीद
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. आरएस पुरा सेक्टर आणि अरनियामध्ये सीमेवरुन रात्री दोन वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला असून एक जवान शहीद झाला आहे. याशिवाय सहा नागरिकही जखमी झाल्याचं वृत्त आहे.
पाकिस्तानकडून अद्यापही गोळीबार सुरु आहे. तर बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत आहेत.
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाककडून 41 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आतापर्यंत 41 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी रेंजर्स मंगळवारपासून थांबून थांबून गोळीबार करत आहे. नौशेरा, आरएस पुरा आणि अरनिया या सेक्टरना निशाणा बनवत आहे. इथे बीएसएफचे जवान तैनात आहेत. याच आठवड्यात सोमवारी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. तर एका मुलाचाही मृत्यू झाला.
सामान्य नागरिक निशाण्यावर
मागील पाच दिवसांत पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात सर्वाधिक मृत्यू सामान्य नागरिकांचा झाला आहे. पाच दिवासता 30 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या सेक्टरमध्ये गुरुवारी जखमी झालेल्या नागरिकांवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या सेक्टरमधील अनेक गावातील नागरिक आपलं घर सोडून इतरत्र गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement