चुकून पाकिस्तानात गेलेला जवान परतला, पाकिस्तानने कोणत्या नियमाने BSF जवानाला परत पाठवलं?
BSF Jawan Return P K Sahu : पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना आहे
BSF Jawan Return : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्यस्थितीत, चुकून बॉर्डर ओलांडलेला BSF जवान भारतात परतला आहे. तब्बल 22 दिवसांच्या अथक वाटाघाटीनंतर पाकिस्तानने भारतीय जवान पी के साहू (P K Sahu) अटारी वाघा बॉर्डरवरुन भारतात दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन-तीन दिवसातच, पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना असते.
जवानांना परत पाठवण्याचा नियम
पी के साहू भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरु झाली आहे. जगभरात अनेक देशात जवानांना परत पाठवण्याचे नियम आहेत. जर एखाद्या जवानाने चुकून सीमा ओलांडली असेल तर त्याला परत पाठवलं जातं. एकीकडे भारत-पाकिस्तान दोन्ही देशाचे जवान एकमेकांवर फायरिंग करत असताना, अशा जवानांना जिवंत परत पाठवणं आश्चर्यकारक वाटू शकतं. पण जर सैनिकाने सरेंडर केलं असेल, तो विनाशस्त्र असेल किंवा शस्त्र न चालवता शरण आला असेल तर अशा जवानांना परत पाठवलं जातं. हे सर्व जिन्हिवा करारानुसार दोन्ही देशांनी मान्य केलं आहे. युद्धजन्य स्थिती असो वा तणावाची स्थिती, अशा परिस्थितीत जवानांना परत पाठवणं दोन्ही देशांना मान्य करावंच लागतं.
जिन्हिवा करारानुसार युद्धातील क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या जायबंदी सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान जर जखमी अवस्थेत सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणे गरजेचं आहे. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या त्या देशात पाठवावं लागतं.
आंतरराष्ट्रीय करारांनुसार आणि मानवाधिकारांच्या तत्वांनुसार, जर एखादा जवान चुकून (उदा. खराब हवामान, दिशाभूल, किंवा प्रशिक्षणादरम्यान) सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर अशा परिस्थितीत त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.
जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी?
ओळख पटवली जाते : संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमापलिकडे गेल्याची खातरजमा केली जाते.
ध्वज बैठक (Flag Meetings) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'फ्लॅग मीटिंग्स' घेतल्या जातात, जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.
शांततामय मार्गाने सुटका : जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झालं तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.
विलंब : परत पाठवण्यामध्ये काही वेळ लागतो, कारण तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो. त्यामुळे या प्रक्रियेला अनेकदा विलंब लागू शकतो
अनेक वेळा भारतीय जवान चुकून LOC (Line of Control) पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात. अशा वेळी, दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं गेलं आहे.
अशाचप्रमाणे पाकिस्तानचे जवान देखील भारतात चुकून आले असतील, तर त्यांनाही परत पाठवण्यात आले आहे.
P K Sahu VIDEO : चुकून सीमा ओलांडलेल्या भारतीय जवानाला पाकिस्तानने सोडलं
संबंधित बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























