(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Banda Boat Accident : यूपीच्या बांदामध्ये रक्षाबंधानासाठी गेलेले 20 जण बुडाले, चार जणांचा मृत्यू
Banda Boat Accident : उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात नाव पलटी झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. नाव पलटी झाल्यामुळे चार जणांचा मृत्यू झालाय तर 16 जण बेपत्ता आहेत.
Banda Boat Accident : रक्षाबंधनासाठी गेलेल्या 20 जणांच्या नावेला मोठा अपघात झालाय. यामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर 16 अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रक्षाबंधनासाठी नदीमधून प्रवास करत असताना बोटीचा तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बांधा जिल्ह्यातील मरका घाट येथून फतेहपूरकडे जाणारी नाव दुर्घटनाग्रस्त झाली. यमुना नदीमध्ये या नावेचं संतुलन बिघडल्यामुळे दुर्घटना घडल्याचं समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक पोहचलं असून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीतून 30 जण प्रवास करत होते, त्यापैकी 16 जण सध्या बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध सुरु आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (boat drowned in yamuna river 4 dead bodies were removed )
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. रेस्क्यू ऑफरेशन सुरु असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही घटनास्थळाकडे धाव घेतली असून बचाव कार्याचा आढावा घेत आहेत.
गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं समोर आले आहे. रक्षाबंधनासाठी नावेतून यमुना नदी पार करत दुसऱ्या ठिकाणी जात होते. त्यावेळी बोटीचं संतुलन बिघडलं. त्यामुळे दुर्घटना घडल्याचं समोर आले आहे. या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय तर 16 जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असल्याचं समजतेय. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
UP | A boat, full of passengers, carrying them in the Yamuna river from Fatehpur to Marka village capsized killing 2 persons. Yet to identify the number of people who were present on the boat. Search & rescue operation on: Banda police pic.twitter.com/89KY7vmlnY
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 11, 2022