एक्स्प्लोर
काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक फोडा, मतांची टक्केवारी वाढवा, अमित शाहांचा प्रदेश भाजपला कानमंत्र
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसची मतं फोडा, असा थेट आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजप प्रदेश समितीची काल रविवारी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक फोडून भाजपच्या मतांची टक्केवारी वाढवण्याचा कानमंत्र अमित शाहांनी प्रदेश भाजपला दिला आहे. तसेच अमित शाह यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशासोबतच मतांच्या टक्केवारीबाबत काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली. आगामी विधासभा निवडणुकीसाठी या आकड्यांवर लक्ष केंद्रित करुन पुढची रणनिती आखण्याचा कानमंत्र अमित शाह यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिल्याचं सूत्रांकडून कळतं आहे.
महाराष्ट्राच्या भाजप कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.
VIDEO | मुख्यमंत्रिपदावरुन युतीमध्ये पुन्हा बेबनाव होणार? | एबीपी माझा
अमित शाह यांनी काय दिला कानमंत्र?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश प्राप्त झालं असलं तरी महाराष्ट्रात काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांना आकर्षित करण्यात भाजपला म्हणावं तसं यश आलं नसल्याचं धक्कादायक वास्तव अमित शाह यांनी बैठकीत मांडलं. याचं कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पडलेल्या मतांच्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत वाढ झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
2014 ला भाजपला 27.56 % मतं पडली होती तर 2019 ला 27.6 % मतदान झालंय. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 2014 ला 34.41 टक्क्यांहून 31.8 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याचा अर्थ गेल्या पाच वर्षात आघाडीत विशेषतः काँग्रेसमध्ये नेतृत्व नसताना आघाडीला मिळणाऱ्या मतांमध्ये फक्त साडेतीन ते चार टक्के मतं घटलीय. तसेच 2014 पासून ते 2019 पर्यंत शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठं नुकसान केल्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात भाजपला याचा खरचं किती फायदा झाला हा चिंतनाचा विषय असल्याचं यातून समोर येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या 32 टक्के मतांवरून 20 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय रणनीती आखण्याचा प्लॅन प्रदेश भाजपने करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधानसभेलाही युती राहणार, पण मुख्यमंत्री भाजपचाच; अमित शाहांचा कोअर कमिटीला कानमंत्र
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होईलच, मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होईल यासाठीही मेहनत घ्या, असा कानमंत्र अमित शाहांनी दिल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचं आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
विश्व
विश्व
Advertisement