एक्स्प्लोर
बेदम मारहाणीचा व्हिडीओ दाखवत तरुणीवर लग्नाची जबरदस्ती, तरुण अटकेत
तरुणीला मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी एका तरुणीला बेदम मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ दाखवून तरुणीला लग्नासाठी धमकावल्याबद्दल तिच्या तक्रारीनंतर आरोपी रोहित तोमरला अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली | तरुणीला मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी एका तरुणीला बेदम मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ दाखवून तरुणीला लग्नासाठी धमकावल्याबद्दल तिच्या तक्रारीनंतर आरोपी रोहित तोमरला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीच्या तिलकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी रोहित तोमर हा एका पोलिस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो एका तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत होता. तसंच हा मारहाणीचा व्हिडीओ दाखवून तुझीही अशीच अवस्था करेन अशी धमकी देत होता. कंटाळलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी रोहित तोमरला अटक केली आहे. पाहा व्हिडीओ |
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























