एक्स्प्लोर

Boeing vs Airbus Difference: Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?

Boeing vs Airbus Difference: एअर इंडिया अपघातानंतर बोईंग विमान पुन्हा चर्चेत आले आहे. जाणून घ्या एअरबस आणि बोईंग विमानांमधील फरक.

Boeing vs Airbus Difference: अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाला गुरुवारी भीषण अपघात (Air India Plane Crash) झाला. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे  विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. अपघातात 241 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून, केवळ एकाच व्यक्तीचा जीव वाचला आहे.

या अपघातानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की, एअरबस आणि बोईंग यामध्ये नेमका काय फरक असतो? सामान्यतः जेव्हा आपण विमान प्रवासासाठी जातो किंवा एअरपोर्टवर एखादं विमान पाहतो, तेव्हा ते एअरबस आहे की बोईंग हे ओळखणं थोडं अवघड जातं. मात्र काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हीही दोघांमधील फरक सहज ओळखू शकतात.

नाकाचा भाग (Nose)

बोईंग विमानांच्या नाकाचा भाग टोकदार आणि धारदार असतो, जो पाहताना बाणासारखा दिसतो. त्याउलट, एअरबस विमानांचं नाक गोलसर आणि थोडं सपाट असतं, ज्यामध्ये सौम्य वळण स्पष्टपणे दिसतं.

कॉकपिटच्या खिडक्या (Cockpit Windows)

बोईंगच्या कॉकपिट खिडक्या V-आकारात थोड्या झुकलेल्या असतात आणि शेवटच्या खिडकीचा कोपरा टोकदार असतो. याच्या विरुद्ध, एअरबसच्या खिडक्या अधिक चौकोनी असतात आणि शेवटच्या खिडकीचा वरचा कोपरा थोडासा कापल्यासारखा दिसतो.

इंजिनचा आकार  

बोईंगच्या इंजिनांचा वरचा भाग गोलसर आणि खालचा भाग सपाट असतो आणि ते पंखाच्या पुढच्या भागात बसवलेले असतात. दुसरीकडे, एअरबसच्या इंजिनांचा आकार पूर्णपणे गोलसर असतो आणि ते पंखाच्या अगदी खाली, जवळपास जोडलेले असतात.

शेपटीची रचना (Tail Design)

बोईंग विमानांची शेपटी थोड्या उतारासह मुख्य भागाला जोडलेली असते, म्हणजेच ती थोडीशी तिरकी असते. तर एअरबस विमानांची शेपटी सरळ रेषेत आणि कोणत्याही उताराशिवाय जोडलेली असते.

लँडिंग गिअर (Landing Gear)

उड्डाणानंतर बोईंग विमानांच्या मागील लँडिंग गिअरचा काही भाग बाहेरून दिसतो, कारण त्यांना झाकण (कव्हर) नसते. त्याउलट, एअरबस विमानांचे मागील गिअर पूर्णपणे विमानाच्या आत बंद होतात आणि बाहेरून दिसत नाहीत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू,डीएनएद्वारे 19 मृतदेहांची ओळख पटली, जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

Gujarat Air India Airplane Crash: आमच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत?, अली कुटुंबीयांचा सवाल, रुग्णालय म्हणतं, लहान असल्यामुळे अवशेष मिळणं कठीण!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget