(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Blue Moon 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी अवकाशात दिसणार 'ब्ल्यू मून'; खगोलप्रेमींसाठी पर्वणी
Blue Moon 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी अवकाशात 'ब्ल्यू मून' दिसणार असून खगोलप्रेमींसाठी पर्वणी मानली जात आहे.
Blue Moon 2021 : रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. उद्याचा दिवस खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. अमेरिकन एस्ट्रोनॉमिकल सोसायटीनं (American Astronomical Society) संकेत गिले आहेत की, या आठवड्याच्या शेवटी आभाळ निरर्भ्र राहिलं तर रविवारी 22 ऑगस्टच्या दिवशी पौर्णिमेला 'ब्लू मून' दिसेल. अर्थातच ब्ल्यू मून पाहता येणार आहे. दरम्यान, उद्या रक्षाबंधनही आहे. म्हणजेच, राखीपौर्णिमेच्या दिवशी ब्ल्यू मून पाहता येणार आहे.
ब्लू मून म्हणजे काय?
ब्लू मून म्हणजे चंद्र निळा असा विचार करत असाल तर तसं काही नाही. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला 'ब्लू मून' म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये 'वन्स इन अ ब्लू मून' (Once in a blue moon) अशी म्हण आहे. 'ब्लू मून' ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी वापरली जाते. एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी याला 'ब्लू मून' असं नाव दिलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणांवरील वातावरणानुसार, चंद्राच्या रंगांमध्ये बदल होतात. जसं कुठे पांढरा शुभ्र, तर कुठे हलक्या लाल रंगाचा किंवा नारंगी, पिवळ्या रंगाचा चंद्र दिसून येतो.
यापूर्वी 31 ऑक्टोबर 2020 मध्ये दिसला होता ब्ल्यू मून
असं फार कमी वेळी होतं की, जेव्हा एका वर्षात 12 ऐवजी 13 पौर्णिमा येतात. असं म्हटलं जातं की, या दिवशी लक्ष्मी देवीचं अवतरण झालं होतं. आणि या दिवशी मा लक्ष्मी पृथ्वीवर प्रदक्षिणा घालते. त्यामुळे अनेकजण या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करतात. तसं पाहिलं तर नेहमीच एकमेकांना मदत केली पाहिजे. पण असं मानलं जातं की, या दिवशी करण्यात आलेल्या दानामुळे आशीर्वाद मिळतो. यापूर्वी 31 ऑक्टोबर 2020 रोजी ब्ल्यू मून दिसून आला होता.
उद्या राखी पौर्णिमा
श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक वाढते. त्यामुळे रक्षाबंधन कधी आहे, त्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात होते. परंतु, सध्या रक्षाबंधनवर कोरोनाचे सावट आहे. रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :