एक्स्प्लोर
50 टक्के कर भरा आणि काळापैसा पांढरा करा!
नवी दिल्ली: देशाचे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या काळापैसा पांढरा करण्याच्या नव्या स्किमची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आता 50 टक्के कर भरुन काळापैसा पांढरा करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे काळा पैसा स्वत: हून घोषित करणाऱ्यांना ही एक शेवटची संधी असल्याचे बोलले जात आहे.
या स्किमनुसार, 31 मार्चअखेर काळापैसा घोषित करणाऱ्यांनाच याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान याबद्दल माहिती देताना हसमुख अढिया यांनी नोटाबंदीनंतर देशातील प्रत्येक व्यवहारावर सरकारची बारकाईने नजर असून, बँकांमध्ये आपली काळी कमाई जमा करणाऱ्यांची यातून सुटका होणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
सीटीबीटीचे संचालक सुशील चंद्रा यांनीही देशभरातून 393 कोटी रुपयांचा काळेधन जप्त करण्यात आले असल्याचे यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या काळ्या कामाईत सोन्यासह रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील 76 कोटी रुपये सोन्याच्या स्वरुपात, तर 316 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात जप्त करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement