एक्स्प्लोर
यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे
![यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे Bjp To Showcase 6 Faces Instead Of One In Up Assembly Election यूपीत भाजपचा सिक्सर, प्रचाराच्या बॅनरवर सहा चेहरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/19200710/BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : भाजपने उत्तर प्रदेशात एक-दोन नव्हे, तर अर्धा डझन चेहरे मैदानात मुख्य प्रचारक म्हणून उतरवले आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक व्यक्तीकेंद्रीत न करण्याची भाजपची रणनीती आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणाही केली जाणार नाही.
5 नोव्हेंबरला सहारनपूरमधून सुरु होणाऱ्या भाजपच्या परिवर्तन यात्रेमध्ये भाजपच्या प्रत्येक बॅनरवर सहा महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचेच फोटो प्रचारादरम्यान बॅनरवर असणार आहेत. एकंदरीत भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे फोटो बॅनरवर लावणं, हे अपरिहार्य होतं. मात्र, इतर चार नेत्यांचे फोटो लावण्यामागे भाजपचे जातीय समीकरण असल्याची चर्चा आहे. भाजप रणनीती आखूनच उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी मैदानात उतरलं आहे.
परिवर्तन यात्रेची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून होणार आहे. सहारनपूरहून भाजपाध्यक्ष अमित शाह ही यात्रा सुरु करतील. त्यानंतर 6 नोव्हेंबरला झाँसीहून दुसरी यात्रा, 8 तारखेला सोनभद्रमध्ये तिसरी आणि 9 नोव्हेंबरला बलियाहून चौथी यात्री सुरु होईल. सर्व यात्रा 24 डिसेंबरला लखनौमध्ये येऊन थांबतील आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
या यात्रेत एकूण 17 हजार किलोमीटरचं अंतर पार केलं जाणार असून, यादरम्यान पंतप्रधान मोदी एकूण 6 मोठ्या सभा घेणार आहेत. त्याचसोबत राष्ट्रीय नेत्यांच्या 30 सभा होणार आहेत. एकूण 75 जिल्ह्यांच्या मुख्यालयात 4 हजार 500 स्वागत कार्यक्रम होणार आहेत. म्हणजेच प्रत्येक दिवशी सुमारे 100 किलोमीटर अंतर कापलं जाणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षातील भांडणाचा फायदाही भाजपला होणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय, भाजपची प्राचर मोहीमही धडाक्यात असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)