एक्स्प्लोर
राष्ट्रपतीपदाच्या अर्जावर सह्यांसाठी भाजप आमदारांची दिल्लीत परेड
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जावर सह्या करण्यासाठी महाराष्ट्रातले भाजपचे अनेक आमदारही दिल्लीत दाखल झाले.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडणूक अर्जावर 50 सूचक, 50 अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असणं बंधनकारक असतं. हे सूचक, अनुमोदक हे मतदारांपैकीच म्हणजे आमदार किंवा खासदारच असायला हवेत, असाही नियम आहे. त्यामुळे आज भाजपने आपल्या आमदार, खासदारांची परेडच राजधानीत भरवली होती.
काळजी म्हणून 4 उमेदवारी अर्जही तयार करण्यात आले होते. त्या प्रत्येकावर आमदारांच्या सह्या घेतल्या जात होत्या.
जर सहमती झाली नाही आणि निवडणूक घेण्याची वेळ आलीच तर 17 जुलैला या राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. 28 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्जावरच्या सह्या ही केवळ औपचारिकताच असली तरी या ऐतिहासिक प्रक्रियेचा भाग होण्याची संधी यानिमित्तानं मिळाली, अशी भावना यावेळी भाजप आमदारांनी व्यक्त केली. पुणे परिसरातून आमदार महेश लांडगे, भीमराव तापकीर, विजय काळे यावेळी दिल्लीत हजर होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement