एक्स्प्लोर
देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य
मुंबई : देशातील एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं देशातील फक्त पाच राज्यात अस्तित्व उरलं आहे. तर देशातील बारा राज्य भाजपमय झाली आहेत. तीन राज्यात मित्रपक्षांसोबत तर नऊ राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे. शिवाय गोवा आणि मणिपूर या दोन राज्यातही सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे प्रयत्न असतील.
2014 लोकसभेनंतरची मोदी लाट पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही कायम दिसली. याच लाटेवर सवार होत भाजपने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये त्रिशतक केलं. तर काँग्रेसकडून उत्तराखंड हिसकावून घेतलं.
अकाली दलसोबत युती असलेल्या पंजाबमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तिथे काँग्रेसने सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं. तर गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये भाजपने खातं उघडत जोरदार मुसंडी मारली आहे. मणिपूर आणि गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली.
सध्या भाजप कुठे-कुठे?
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील 12 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. मणिपूर आणि गोव्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपला यश मिळाल्यास हा आकडा 14 होईल. अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यात भाजप मित्रपक्षांसोबत सत्तेत सहभागी आहे. तर इतर 9 राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.
काँग्रेसची सत्ता कुठे-कुठे?
- पंजाब
- हिमाचल प्रदेश
- कर्नाटक
- मेघालय
- मिझोराम
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement