एक्स्प्लोर
Advertisement
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 5 जणांचा या पहिल्या यादीत समावेश आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. एकूण 182 जागांपैकी 70 जागांवरचे उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहेत. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 5 जणांचा या पहिल्या यादीत समावेश आहे.
काँग्रेसशी दगाफटका करणाऱ्या राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जाडेजा, सी के रावळ, मानसिंह चौहान, रामसिंह परमार या पाचही जणांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. शिवाय यादीवर नजर टाकल्यास पटेल उमेदवारांची संख्याही नजरेत भरणारी आहे. पहिल्या यादीत 70 पैकी 13 उमेदवार हे पटेल आहेत.
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिममधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा मधून निवडणूक लढवणार आहेत. खरंतर भाजप निवडणूक रणनीती म्हणून विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देईल अशी चर्चा होती. मात्र, पहिल्या यादीत तरी फारसा बदल दिसत नाही. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 14 डिसेंबरला होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया अगदी जवळ असतानाही कुठलाच पक्ष आपली पहिली यादी जाहीर करायला तयार नव्हता. दिल्लीत बुधवारी भाजपच्या संसदीय मंडळाची मीटिंग पार पडलेली होती. मात्र, त्यावेळी पहिली यादी जाहीर करण्यात आली नव्हती. काँग्रेसनंही आपली निवडणूक समितीची बैठक एक दिवसांनी पुढे ढकलेली होती. त्यामुळे पहले आप-पहले आपच्या या खेळात नेमकं कोण यादी जाहीर करणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. आज भाजपनं पहिली यादी जाहीर केल्यावर काँग्रेस उद्यापर्यंत पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement