एक्स्प्लोर

3 November In History : औरंगजेबचा जन्म, 'मुघले आझम' आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूरचा जन्म; आज इतिहासात

On This Day In History : 'मुघले आझम' या चित्रपटातील अकबराची भूमिका आजरामर करणाऱ्या पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता. 

3rd November In History : आंतराळ विश्वासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1957 साली सोव्हिएत रशियाने लायका नावाची एक कुत्री (Laika Dog) अंतराळात यशस्वीपणे पाठवली. एखादा सजीव अंतराळात जगू शकतो काय याची चाचपणी होती. या प्रयोगानंतर मानवाचा अंतराळातील प्रवेशाचा मार्ग खुला झाला. 

1618- मुगल सम्राट औरंगजेबचा जन्म

मुगल साम्राज्याचा सहावा सम्राट औरंगजेब (Aurangzeb) याचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी झाला. औरंगजेब 1636 ते 1644 दक्षिणेचा, 1645 ते 1648 गुजरातचा, 1648 ते 1652 मुलतानचा आणि शेवटी 1652 ते 1657 पुन्हा दक्षिणेचा सुभेदार होता. दक्षिणेत पहिल्यावेळी सुभेदार असताना, त्याने बागलाण जिंकले, शहाजी महाराजांचा पराभव करून त्याने अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. 

औरंगजेब आपल्या भावांचा पराभव करुन 1658 रोजी दिल्लीच्या सिंहासनावर बसला. मुराद, दारा, शुजा, सुलैमान, शुकोह यांचा खून केल्यानंतर जून 1659 मध्ये त्याचे राज्यारोहण झाले. औरंगजेबने दक्षिणेचे स्वराज्य जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले, पण मराठे काही त्याच्या हाती लागले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो दक्षिणेच्या स्वारीवर आला. त्याला या ठिकाणी तब्बल नऊ वर्षे छत्रपती संभाजी महाराजांशी झुंजावं लागलं. त्यानंतरही महाराणी ताराराणींनी त्याला 25 वर्षे झुंजवलं.

औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या 91 व्या वर्षी, म्हणजे 1907 साली महाराष्ट्राच्या (भिंगार) अहमदनगर येथे झाला. त्यांची कबर खुलताबाद येथे आहे. 

1906- पृथ्वीराज कपूर यांचा जन्मदिन 

भारतीय चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेते पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांचा आजच्या दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 1906 रोजी जन्म  झाला. आपल्या भारदस्त आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली. त्यांचे 'अलेक्झांडर द ग्रेट' आणि 'मुघले आझम' (Mughle Azam) हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. मुघले आझम या चित्रपटातील त्यांची अकबराची भूमिका आजरामर ठरली.

1933- डॉ. अमर्त्य सेन यांचा जन्मदिन 

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन (Amartya Sen) यांचा जन्म आजच्या दिवशी, म्हणजे 3 नोव्हेंबर 1933 रोजी झाला. 'कल्याणाभिमुख अर्थशास्त्र आणि सामाजिक पर्याय सिद्धान्त' या विषयांतील कार्यासाठी 1998 सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले.

गरिबी ,आरोग्य ,शिक्षण, मानवी  विकास आणि एकूणच मानवी कल्याण हा त्यांच्या विचाराचा गाभा आहे. केंद्र शासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. अमर्त्य सेन हे 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

1957- सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिला सजीव पाठवला 

अंतराळात यान पाठवल्यानंतर सोव्हिएत रशियाने (Russia) अंतराळात पहिला सजीव पाठवला. 3 नोव्हेंबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने लायका नावाची एक कुत्री (Laika Dog) अंतराळात यशस्वीपणे पाठवली. अशा प्रकारे सोव्हिएत रशियाने अंतराळात पहिलाच सजीव पाठवला, त्यामुळे मानवाचा अंतराळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

1992- बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष 

राष्ट्रपती जॉर्ज एच डब्लू बुश यांचां पराभव करुन बिल क्लिंटन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 3 नोव्हेंबर 1992 रोजी बिल क्लिंटन हे अमेरिकेचे 42 वे अध्यक्ष बनले. नंतरच्या काळात त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांना निवडून यायची किमया केली. पण त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे अमेरिकेत खळबळ माजली. अमेरिकेच्या राजकीय इतिहासात खळबळ माजवणाऱ्या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेम प्रकरणाचा खुलासा (US President Bill Clinton Monica Lewinsky Sex Scandal) झाला. 21 सप्टेंबर 1998 रोजी या दोघांच्या प्रेम प्रकरणाचा व्हिडीओ लोकांसमोर आला. त्यानंतर यावर बिल क्लिंटन यांनी ज्युरी समोर यासंबंधी आपला जबाब दिला. हा जबाब सर्व माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर बिल क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

2004- अफगाणिस्तानमध्ये हमिद करझाई राष्ट्रपतीपदी 

अफगाणीस्तानमध्ये 2004 साली राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये 3 नोव्हेंबर 2004 रोजी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी हमिद करझाई यांची निवड करण्यात आली. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget