एक्स्प्लोर

क्रॉस कंट्री बाईकर सना इक्बालचा मृत्यू, पतीवर आरोप

मंगळवारी सकाळी सना इक्बाल पती अब्दुल नदीमसोबत कारने जात होती. त्यावेळी हैदराबादमध्ये त्यांची कार दुभाजकावर आदळली. अपघातात 30 वर्षीय सनाचा मृत्यू झाला, तर पती अब्दुलची दोन हाडं मोडली.

हैदराबाद : क्रॉस कंट्री बाईकर सना इक्बालचा हैदराबादमध्ये कार अपघातात मृत्यू झाला. सना पतीसोबत जात असताना कार डिव्हायडरवर आपटून हा अपघात घडला. सनाच्या आईने तिच्या पतीवर आरोप केले आहेत. मंगळवारी सकाळी सना इक्बाल पती अब्दुल नदीमसोबत कारने जात होती. त्यावेळी हैदराबादमध्ये त्यांची कार दुभाजकावर आदळली. अपघातात 30 वर्षीय सनाचा मृत्यू झाला, तर पती अब्दुलची दोन हाडं मोडली. सना आणि इक्बालला 2015 मध्ये मुलगा झाला होता. हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप सनाच्या माहेरच्यांनी केला आहे. त्यांनी नरसिंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून प्रथमदर्शनी हा अपघातच वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'सना आणि तिच्या पतीमध्ये काही मतभेद असतील, मात्र वरकरणी हा अपघातच वाटत आहे. घटनास्थळाला भेट दिली असता त्यांच्या वाहनाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचं दिसतं' असं पोलिस म्हणाले. नैराश्य आणि आत्महत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत सना अग्रस्थानी होती. तिने 38 हजार किलोमीटरच्या क्रॉस कंट्री राईडमध्ये भाग घेतला होता. नदीम आणि त्याची आई सनाला पैशासाठी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप सनाचे मित्र आणि कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्या जाचामुळे ती फक्त 3-4 महिनेच नवऱ्यासोबत राहिली, असं सनाच्या बहिणीने सांगितलं. मंगळवारी नदीम तिला नेण्यासाठी घरी आला होता. तिने नकार दिल्यामुळे तो चिडला. मात्र अखेर तो सनाला घेऊन गेला. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी आली, असं सनाच्या कुटुंबाने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Exclusive : राज ठाकरेंशी युती का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं राज'कारण'
राज ठाकरेंशी युती का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं राज'कारण'
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaArjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Exclusive : राज ठाकरेंशी युती का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं राज'कारण'
राज ठाकरेंशी युती का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं राज'कारण'
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
×
Embed widget