IPS Amit Lodha : आयपीएस अमित लोढा निलंबित; भ्रष्टाचाराचा आरोप, 'खाकी' वेब सीरिजमुळे चर्चेत
IPS Amit Lodha : 'खाकी' (Khakee) वेब सीरिजमुळे चर्चेत आयपीएस अमित लोढा (Amit Lodha) यांना निलंबित करण्यात आलं आहे. बिहारच्या दक्षता विभागाने लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
![IPS Amit Lodha : आयपीएस अमित लोढा निलंबित; भ्रष्टाचाराचा आरोप, 'खाकी' वेब सीरिजमुळे चर्चेत Bihar IPS officer Amit Lodha who inspired Netflix web series Khakee suspended after being charged with corruption IPS Amit Lodha : आयपीएस अमित लोढा निलंबित; भ्रष्टाचाराचा आरोप, 'खाकी' वेब सीरिजमुळे चर्चेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/10/435c6c11bece7815385276ae8a5c7cae1670648772044322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPS Amit Lodha Suspended : बिहारमधील (Bihar) आयपीएस अधिकारी अमित लोढा (IPS Officer Amit Lodha) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बिहारच्या दक्षता विभागाने लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. नेटफ्लिक्सवरील (Netflix) खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee The Bihar Chapter) या वेब सीरिजमुळे (Web Series) अमित लोढा चर्चेत आहेत. अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला (Netflix) मदत केल्याच्या आरोपांखाली विशेष दक्षता विभागाने अमित लोढा यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
खाकी वेब सीरिजमुळे अमित लोढा यांच्या अडचणीत वाढ
आयपीएस अमित लोढा यांच्यावर बिहार पोलीस दलाचे महानिरीक्षक पदाची जबाबदारी आहे. दरम्यान शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर (Friday Storytellers) या कंपन्यांसोबत व्यावसायिक करार केल्याने लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बिहार डायरी (Bihar Diaries) या पुस्तकावर आधारीत खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee The Bihar Chapter) या वेब सीरिजमुळे अमित लोढा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Bihar IPS officer Amit Lodha, who inspired 'Khakee', charged with corruption; suspended
— ANI Digital (@ani_digital) December 9, 2022
Read @ANI Story | https://t.co/C8GZL29Pq3#KhakeeTheBiharChapter #AmitLodha #Bihar #Netflix pic.twitter.com/pjx8ozxqxz
खाकी वेबसीरिज बिहार डायरीज' या पुस्तकावर आधारित
अमित लोढा यांच्या बिहार डायरीज या पुस्तकावर आधारित 'खाकी: द बिहार चॅप्टर' या वेब सीरिजसाठी ते सध्या चर्चेत आहे आहेत. ही वेबसीरीज 25 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ही वेबसीरीज अमित लोढा यांनी 2017 मध्ये लिहिलेल्या 'बिहार डायरीज' या पुस्तकावर आधारित आहे. 'बिहार डायरीज' हे पुस्तक बेस्टसेलर ठरलं होतं.
वेबसीरिजसाठी पोलीस किंवा सरकारची न परवानगी घेतल्याचा आरोप
आयपीएस अमित लोढा यांच्यावर लोकसेवा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लोढा यांनी पुस्तक लेखन आणि वेबसीरिज निर्मितीसाठी पोलीस किंवा राज्य सरकारची परवानगी घेतली नव्हती. वेबसीरिजच्या फायनान्स आणि शूटिंगशी संबंधित मुद्द्यामुळे लोढ आता अडचणीत सापडले आहेत. खाकी वेबसीरिजच्या निर्मितीसाठी निधी पुरवण्यात लोढा यांचा भूमिका काय याची तपासणी सध्या सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)