Bihar Election Results 2020 : बिहारमधील 243 विधानसभा क्षेत्रांच्या तीन टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलांनुसार राजद नेतृत्त्वाच्या महागठबंधन आणि भाजपच्या नेतृत्त्वाच्या एनडीएमध्ये कांटे की टक्कर दिसून येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात पहिल्या बॅलेट मतांची मोजणी झाली आहे. ज्यामध्ये हाती आलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार महागठबंधन आणि एनडीएमध्ये चढाओढ दिसत आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत 200 हून अधिक जागांचे सुरुवातीचे कल जाहीर केले आहेत. त्यानुसार, एनडीए 102 जागांवर आघाडीवर आहे. तर महागठबंधन 87 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, हे आकडे सतत बदलताना दिसत आहेत.


बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 207 जागांच्या हाती आलेल्या कलांनुसार राजद 57 जागांवर, भाजप 54 जागांवर, जदयू 45 जागांवर, काँग्रेस 17 जागांवर, तर भाकपा-माले 11 जागांवर, व्हीआयपी पाच जागांवर, तर लोजपा तीन जागांवर आघाडीवर आहे. तसेच माकपा दोन जागांवर आघाडीवर आहे. तसेच भाकपा, बसपा, एआयएमआयएम प्रत्येकी एक-एक जागेवर आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत.


बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.


दरम्यान, निवडणूक आयोगानं सांगितलं की, मतगणना सुरुळीत पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी सांगितलं की, मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या तिथं देखील विषेश सुरक्षा लावण्यात आली होती.


पाहा व्हिडीओ : Bihar Election Results 2020 | या घडीला एनडीए महागठबंधनपेक्षा पुढे



एक्झिट पोल काय सांगतात?


एबीपी-सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीला 104-128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महागठबंधनला 108-131 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 ते 3 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या पारड्यात 4 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे.


गठबंधनमध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात?


एबीपी न्यूज-सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच भाजपला 66 ते 74 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हीआयपीला 0-4 जागा आणि हमला 0-4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याव्यतिरिक्त महागठबंधनचं पाहिलं तर आरजेडीला 81-89 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि काँग्रेसला 21 ते 39 जागा मिळू शकतात. याव्यतिरिक्त डाव्या पक्षांना 6 ते 13 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.


कोणी किती जागांवर निवडणूक लढवली?


एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूने 115 जागांवर भाजपने 110, विकासशील इन्सान पार्टीने 11 आणि जीतनराम मांझी यांच्या हम (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) ने 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. परंतु, यंदाच्या वेळी बिहार निवडणुकीत लोजपाची साथ एनडीएला मिळालेली नाही. एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान यांनी वेगळा मार्ग निवडत एकट्याने निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) 144 जागांवर निवडणूक लढणार आहे. यांच्यासोबत काँग्रेस 70 जागांवर लढत आहे. CPI-(एमएल) 19 जागांवर, सीरीआय 6 जागांवर आणि सीपीआय एम 4 जागांवर निवडणूक लढत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :