Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र संपूर्ण निकाल हाती यायला वेळ लागणार असण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळं Bihar Election साठी मतगणना केंद्रांची संख्या यावेळी वाढवण्यात आली आहे. बिहारच्या संपूर्ण निकालासोबत काही खास जागांच्या निकालाकडं देशाचं लक्ष लागून आहे.
बिहारची जनता मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सहाव्यांदा मुख्यमंत्री बनवण्याची संधी देणार की युवा चेहरा तेजस्वी यादव यांना संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. या दोघांसह काही निकालांकडे लोकांचं लक्ष आहे. पाटण्याच्या जवळच असलेल्या राघोपूर विधानसभा क्षेत्रात तेजस्वी यादव लढत आहेत. सध्या ते आघाडीवर असल्याचं कळतंय. या निकालाकडं सर्वांचं लक्ष आहे. भाजपचे सतीश कुमार यादव हे तेजस्वी यांच्या विरोधात आहेत.
बिहार समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा क्षेत्रात लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आरजेडी नेते तेज प्रताप यादव मैदानात आहेत. त्यांच्यासमोर जदयूचे विद्यमान आमदार राजकुमार राय, पप्पू यादव यांच्या पक्षाचे अर्जुन प्रसाद यादव यांचं आव्हान आहे. हसनपूरमध्ये 54.5 टक्के मतदान झाले आहे. महाराजगंजचे बाहुबली माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांचे पूत्र रणधीर सिंह छपरामधून आघाडीवर असल्याची माहिती आहे. या निकालाकडेही लोकांचं लक्ष आहे.
सासाराम विधानसभा क्षेत्रात भाजपमधून निष्कासित केलेले रामेश्वर चौरसिया एलजेपीकडून निवडणूक मैदानात आहेत. इथं जेडीयूचे अशोक कुमार आणि राजदचे राजेश कुमार गुप्ता यांच्यात मुकाबला आहे. दिनारा विधानसभा क्षेत्राच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष आहे. भाजपचे बंडखोर राजेंद्र सिंह एलजेपीकडून मैदानात आहेत. त्यांचा सामना नितीश सरकारमधील मंत्री जयकुमार सिंह यांच्याशी आहे.पूर्वी चंपारणमधील गोविंदगंज विधानसभा क्षेत्रात एनडीएचे सुनील मणि त्रिपाठी, लोजपाचे विद्यमान आमदार राजू तिवारी आणि काँग्रेसचे बृजेश पांडेय यांच्यात मुकाबला आहे. काँग्रेस उमेदवार बृजेश पांडेय पत्रकार रवीश कुमार यांचे मोठे बंधू आहेत.
मधेपुरा विधानसभा क्षेत्रातून जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव, आरजेडी उमेदवार चन्द्रशेखर आणि एनडीएचे निखिल मंडल यांच्यातील मुकाबल्याकडेही सर्वांचं लक्ष आहे. तर परसामधून तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांचा सामना आरजेडीचे छोटे लाल यांच्याशी आहे.
सहरसा विधानसभा क्षेत्रातून माजी खासदार आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद आरजेडीकडून मैदानात आहेत. त्यांचा सामना एनडीएचे आलोक रंजन झा यांच्याशी होतोय. बांकीपूरमध्ये प्लूरल्स पार्टीच्या पुष्पम प्रिया चौधरी यांच्यामुळं चर्चा आहे. मात्र इथं मुख्य मुकाबला शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र काँग्रेसचे लव सिन्हा आणि भाजपाचे नितिन नवीन यांच्यात आहे.
Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?
Bihar निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.
Bihar Election Results | नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहार निवडणुकीचा आज निकाल!
बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.
निवडणूक आयोगानं सांगितलं की, मतगणना सुरुळीत पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी सांगितलं की, मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या तिथं देखील विषेश सुरक्षा लावण्यात आली होती.
Bihar Election Results LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, पाहा एका क्लिकवर