Bihar 2020 Election Result LIVE | बिहारचा विश्वास पंतप्रधानांवर आहे हे स्पष्ट झालं - चिराग पासवान

Bihar Election Result 2020 LIVE Updates, Bihar Vote Counting Highlights : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अखेर संपली आहे. 125 जागांसह बिहारमध्ये एनडीएचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं आहे. कलांमध्ये सुरुवातीला मुसंडी मारणाऱ्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या. मात्र 76 जागांसह राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Nov 2020 11:31 AM
निकालानंतर चिराग पासवान यांची पत्रकार परिषद, 'बिहारचा विश्वास पंतप्रधानांवर आहे हे स्पष्ट झालं आहे. मी भाजप आणि पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. मला आनंद आहे की लोकजनशक्ती पार्टीला मिळालेला प्रतिसादाबद्दल. एकटे लढूनही 25 लाख मतं आणि 6 टक्के व्होट शेअर मिळाला. यामुळे पक्षात उर्जा निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आहे. 2025 ला आम्ही ताकदीने मैदानात असू . बऱ्याच जागी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर, बहुतेक जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. २०२५ चं जे लक्ष्य आहे त्याच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहे. - चिराग पासवान
बिहारमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार बनवल्याबद्दल अभिनंदन.. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं ट्वीट. बिहार निकालावरची ही पहिली वरिष्ठ पातळीवर कमेंट आहे. बिहार मधला सस्पेन्स संपला?
बिहार निवडणुकीत एमआयएमला मिळालेल्या विजयावरून सोलापुरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सोलापुरातील एमआयएम पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. एमआयएमचे सोलापूर शहर आणि जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी हे बिहारमध्ये एमआयएमचे स्टार प्रचारक म्हणून प्रचार करीत होते. त्यामुळे हा आनंद द्विगुणित करणारा असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. येणाऱ्या दिवसात सोलापूर महानगरपालिकेत देखील निवडणूका होणार आहेत. फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणुकात देखील यश संपादन करण्यासाठी बिहार निवडणुकांमुळे प्रोत्साहन मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये कलांनुसार एनडीएची आघाडी कायम, एनडीए 121 तर महागठबंधन 114 जागांवर पुढे
बिहारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर.. बिहारमध्ये कलांनुसार एनडीएची आघाडी कायम, एनडीए 123 तर महागठबंधन 112 जागांवर पुढे
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आता सध्या 243 पैकी 43 जागा अशा आहेत जिथं दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ 1 हजार मतांचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे. 80 टक्के मतांची मोजणी अजून व्हायची आहे.

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं सांगितलं आहे की, बिहार निवडणुकीत सुमारे 4.10 कोटी मतं पडली आहेत. त्यापैकी आतापर्यंत 92 लाख मते मोजली गेली आहेत. पूर्वी मतमोजणीच्या 25-26 फेऱ्यांचा वापर होता, यावेळी या फेऱ्यांची संख्या 35 वर गेली आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू राहू शकते असं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एचआर श्रीनिवास यांनी सांगितलं आहे.
बिहारमध्ये कलांनुसार एनडीएची आघाडी कायम, एनडीए 130 तर महागठबंधन 102 जागांवर पुढे
भाजपला बिहार निवडणुकीत मोठी आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. तर जेडीयू अनेक ठिकाणी पिछाडीवर आहे. बिहार निवडणुकीत गठबंधनमध्ये नीतीश कुमार यांचा पक्ष नेहमीच मोठ्या भागीदारीच्या भूमिकेत दिसून आला आहे. दरम्यान, भाजपने राज्यात कधीही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा उमेदवार उभा केलेला नाही.
बिहार निवडणुकीत जवळपास 4.10 कोटी मतदान झालं. त्यापैकी 92 लाख मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. यापूर्वी मतमोजणीचे 25 ते 26 फेऱ्या होत असत. परंतु यंदा सुमारे 35 फेऱ्या होती. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली.
बिहारमध्ये एनडीएची मुसंडी, नितिश कुमारांच्या कार्यालयात सेलिब्रेशन सुरु, कार्यकर्त्यांचा जल्लोष #BiharElection2020
कलांनुसार महागठबंधनला मागे टाकत एनडीची 126 जागांवर आघाडी. महागठबंधन 102 जागांवर पुढे. दुसरीकडे 28 जागांवर एक हजारपेक्षा कमी मतांचं अंतर तर 70 जागांवर अटीतटीची लढाई
कलांमध्ये महागठबंधनची घसरगुंडी, एनडीए 131 तर महागठबंधन 99 जागांवर पुढे, बिहारमध्ये भाजपचं सेलिब्रेशन
एनडीए आणि महागठबंधनच्या आकडेवारीमधील दरी वाढली, आताच्या कलांमध्ये एनडीएची मुसंडी, एनडीए 121 तर 108 जागांवर पुढे, तर पहिल्या क्रमांकासाठी राजद आणि भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपला 71 तर राजदला 71 जागांवर आघाडी
बिहार निवडणुकीच्या कलांमध्ये मोठे बदल, एनडीएला बहुमत तर महागठबंधनला 106 जागांवर आघाडी
ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 112 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 122 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 91, काँग्रेस 22 आणि लेफ्ट 11 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 55, जेडीयू 49, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत.
हसनपूर विधानसभा मतदारसंघातून लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप पिछाडीवर, 10 वाजेपर्यंत ते आघाडीवर होते. तर इमामगंजमधून माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी देखील पिछाडीवर आहेत.
बिहार निवडणुकीचे या घडीचे कल, एनडीएची मुसंडी, 123 जागांवर आघाडी तर महागठबंधन 112 जागांवर पुढे
बिहारमध्ये मतमोजणी सुरु, कलांमध्ये महागठबंधन शतक पार, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात महागठबंधनने बहुमताचा आकडा पार केला, प्रतिस्पर्धी एनडीएचंही शतक
बिहार निवडणुकीच्या कलांमध्ये बदल, एनडीएची मुसंडी, 119 जागांवर आघाडी तर महागठबंधन 116 जागांवर पुढे
बिहार निवडणुकीच्या कलांमध्ये बदल, एनडीएची मुसंडी, 119 जागांवर आघाडी तर महागठबंधन 116 जागांवर पुढे
31 वर्षाच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिलंय, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत दिली.
बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरु असून राजदचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर समर्थक जमले आहेत.
बिहारमध्ये अटीतटीची लढत; एनडीए 109, महागठबंधन 126 जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे इथे भाजप जेडीयूपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे.
बिहारमध्ये अटीतटीची लढत; एनडीए 109, महागठबंधन 126 जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे इथे भाजप जेडीयूपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे.
बिहारमध्ये मतमोजणी सुरु, कल - एनडीए 59, महागठबंधन - 100 जागांवर आघाडीवर (जेडीयू 27, भाजप 27, राजद 52, काँग्रेस 16, लोजप 01, इतर 07)
बिहारमध्ये मतमोजणी सुरु, राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर, कल - एनडीए 40, महागठबंधन - 72 जागांवर आघाडीवर
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.

मतगणना आठ वाजता सुरु होणार आहे. निकालाचा कल 9 वाजेपासून यायला सुरुवात होईल मात्र निकाल यायला वेळ लागू शकतो. कारण प्रत्येक विधानसक्षा क्षेत्रात औपचारिक रित्या 5 बूथवरील मतदान आणि व्हीव्हीपीटी चिठ्ठ्या तपासल्या जाणार आहेत. सोबतच कोरोना काळात झालेली भारततील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं निवडणूक आयोगानं मतगणना केंद्रांची संख्या दीडपट वाढवली आहे. या सर्वांचा मेळ लावण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो.

सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जातील. नऊ वाजता पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण निकाल हाती यायला वेळ लागणार असण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळं Bihar Election साठी मतगणना केंद्रांची संख्या यावेळी वाढवण्यात आली आहे.

मतगणनेला सुरुवात, पोस्टल बॅलेटची मतगणना सुरु बिहार विधानसभेचे पहिले कल हाती, तीन जागांवर भाजप आघाडीवर
बिहारमध्ये मतमोजणी सुरु, सुरुवातीचे कल - एनडीए 8, महागठबंधन - 8 जागांवर आघाडीवर
बिहर विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज म्हणजेच, 10 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणूकींचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी

Bihar Election Result 2020 LIVE Updates, Bihar Vote Counting Highlights: बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज घोषित करण्यात येणार आहेत. एबीपी माझा आपल्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्वात जलद अपडेट्स पोहोचवणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संपूर्ण दिवसभर एबीपी माझावर बिहार निवडणुकीचं खास कव्हरेज करण्यात येणार आहे.


 


बिहर विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.


 


कुठे पाहू शकता Bihar Election Results?


 


एबीपी माझा न्यूज चॅनलसोबतच तुम्ही मोबाईल आणि इतर अनेक प्लॅटफॉर्म्सवर टेक्स्ट, फोटो, व्हिडीओसोबतच ABP Majha च्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरही तुम्ही निकालाचे अपडेट्स मिळवू शकता. तसेच एबीपी माझा मोबाईल अॅप आणि हॉटस्टारवरही निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता. त्याचसोबत युट्युबवरही एबीपी माझाच्या लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता. तुम्ही तुमच्या अॅन्ड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Majha App डाऊनलोड करून लाईव्ह टीव्हीसोबतच निवडणुकीच्या निकालांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्याही वाचू शकता.


 


लाईव टीव्ही : https://marathi.abplive.com/live-tv


 


 


 


मराठी वेबसाइट : https://marathi.abplive.com/
हिंदी वेबसाइट : https://www.abplive.com/
अंग्रेजी वेबसाइट : https://news.abplive.com/


 


 


 


एपीबी माझा युट्युब लाईव्ह : 



 


 


त्याचसोबत सोशल मीडियावरही तुम्ही बिहार विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.


 


 


 


एबीपी माझा फेसबुक अकाउंट : https://www.facebook.com/abpmajha


 


 


 


एबीपी माझा ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv


 


 


 


एबीपी माझा इन्स्टाग्राम अकाउंट : https://www.instagram.com/abpmajhatv/?hl=en


 


 


 


एबीपी माझा टेलिग्राम चॅनल : https://t.me/abpmajhatv

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.