Bihar Election Result : सुरुवातीच्या कलांनुसार NDA आघाडीवर; मात्र नितीशकुमार यांच्या अडचणीत वाढ!
Bihar Election Result 2020 : सुरुवातीच्या आकड्यांनुसार, भाजपला बिहार निवडणुकीत मोठी आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. तर जेडीयू अनेक ठिकाणी पिछाडीवर आहे. बिहार निवडणुकीत गठबंधनमध्ये नीतीश कुमार यांचा पक्ष नेहमीच मोठ्या भागीदारीच्या भूमिकेत दिसून आला आहे. परंतु, सध्या चित्र पाटलटलेलं दिसत आहे.
Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडणुकींच्या सध्याच्या कलांनुसार, भारतीय जनता पार्टी आपले सहकारी नीतीश कुमार यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनचे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार नीतीश कुमार आहे. परंतु, त्यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला बिहारच्या जनतेनं विरोध केल्याचं दिसत आहे.
सुरुवातीच्या आकड्यांनुसार, भाजपला बिहार निवडणुकीत मोठी आघाडी मिळाल्याचं दिसत आहे. तर जेडीयू अनेक ठिकाणी पिछाडीवर आहे. बिहार निवडणुकीत गठबंधनमध्ये नीतीश कुमार यांचा पक्ष नेहमीच मोठ्या भागीदारीच्या भूमिकेत दिसून आला आहे. दरम्यान, भाजपने राज्यात कधीही मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा उमेदवार उभा केलेला नाही.
तेजस्वी यादवच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या महागठबंधनला अनेक एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं होतं. परंतु, अनेक जागांवर महागठबंधनला कांटेकी टक्करचा सामना करावा लागत आहे.
महागठबंधनच्या वतीने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी सत्तेत आल्यानंतर दहा लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान रोजगार मिळवून देण्याचं आश्वासन हेच महागठबंधनाचं युएसपी होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय तेजस्वी यादवने या निवडणुकीत तेजस्वीने आरजेडीचं नेतृत्त्व अत्यंत प्रभावीपणे केलं.
भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडणुकींच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. याव्यतिरिक्त भाजपचे इतर ज्येष्ठ नेहेती प्रचार सभांसाठी हजर होते. त्यामध्ये प्रामुख्याने राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा यांच्यासोबत इतरही दिग्गज नेते उपस्थित होते.
निवडणुकांमध्ये आपले वडील रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान सतत नीतीश कुमार यांच्यावर टीका करत होते. बिहार एनडीए गठबंधनातून बाहेर पडत वैयक्तिक पातळीवर लढणारे चिराग पासवान केंद्र सरकारचं समर्थन करत आहे.
निकालांच्या धामधुमीत निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
बिहार निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काही वेळात निकाल हाती येणार आहेत. सोबतच मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांचा निकाल देखील आज घोषित होत आहे. या निकालांचे कल हाती आले आहेत. बिहारमध्ये एनडीएनं आघाडी घेतली आहे तर मध्यप्रदेशातही भाजपनं मुसंडी मारलीय. या धामधुमीत निवडणूक आयोग आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?
- Bihar Election Result: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 'या' जागांच्या निकालाकडे सर्वांचं खास लक्ष
- Bihar Election Results | नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहार निवडणुकीचा आज निकाल!
- Bihar Election Results LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, पाहा एका क्लिकवर