Bihar Election 2025: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जो गोंधळ घातला तोच सेम पॅटर्न बिहारच्या महाआघाडीमध्ये सुद्धा रंगला!
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये महाआघाडीत जागावाटपावरून राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhan Sabha election 2025) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा संपला आहे, परंतु महाआघाडीला (Mahagathbandhan seat sharing) जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नाही. जागावाटपावरून राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी यांच्यातील वादामुळे महाआघाडी खरोखरच तुटली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनुकूल स्थिती असतानाही महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपावरून अभूतपूर्व गोंधळ घातला त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाची कोणतीही घोषणा न होता, पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 125 महाआघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या 121 जागांपैकी राजदने 72, काँग्रेसने 24, डावे 21, व्हीआयपीने 3 आणि आयआयपीने 2 जागांसाठी अर्ज दाखल केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात राजदचा उमदेवार (RJD Congress alliance)
नामांकनाच्या पहिल्या टप्प्यात, चार जागा आहेत जिथे महाआघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत. दोन्ही टप्प्यात, महाआघाडीचे पक्ष 10 जागांवर एकमेकांविरुद्ध लढत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या ताब्यात असलेल्या जागेवर आरजेडीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी लोकप्रिय असलेल्या कुटुम्बा येथून प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे उमेदवार आहेत. या जागेसाठी आरजेडीने त्यांचे नेते सुरेश पासवान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश पासवान यांनी एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की,"औरंगाबादमध्ये 5-6 जागांवर मैत्रीपूर्ण लढाईची तयारी सुरू आहे. कुटुम्बा जागेवर आरजेडी आणि काँग्रेसमध्येही मैत्रीपूर्ण लढाई सुरू आहे. राजेश राम किंवा मी अद्याप आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही."
आरजेडीने गौरा बौराम यांच्यासाठी पत्र दिले (Mahagathbandhan crisis)
जागा वाटपावरून परिस्थिती इतकी गंभीर झाली की परिस्थिती हाताळण्यासाठी आरजेडीला हस्तक्षेप करावा लागला. गौरा बौराम जागेसाठी, आरजेडीने दरभंगाच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्पष्ट केले की ही जागा विकासशील इन्सान पक्षाला देण्यात आली आहे. आरजेडी मुख्यालयाचे प्रभारी मुकुंद सिंह यांनी हे पत्र पाठवलेआरजेडीने अफजल अली यांना ही जागा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नंतर तडजोडीचा भाग म्हणून ती व्हीआयपींना द्यावी लागली.
मुकेश साहनी 15 जागांसाठी सहमत (RJD seat allocation)
विकासशील इंसान पक्षाचे मुकेश साहनी यांनी एका महत्त्वपूर्ण मागणीने महाआघाडीला हादरवून टाकले. सुरुवातीला त्यांनी 60 जागा, नंतर 40, नंतर 20 आणि शेवटी 15 जागा देण्यास सहमती दर्शवली. राजद फक्त 12 जागा देण्यास तयार होता, परंतु साहनी ठाम राहिले आणि निवडणूक जिंकल्यास त्यांना उपमुख्यमंत्री घोषित करावे अशी मागणी केली.अखेर, राहुल गांधी आणि सीपीआय (एमएल) नेतृत्वाच्या पुढाकारामुळे मुकेश साहनी यांना 15 जागा, एक राज्यसभा जागा आणि दोन एमएलसी जागा देण्यात आल्या.
राहुल गांधींची मध्यस्थी (Rahul Gandhi mediation)
राहुल गांधींनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळली. मुकेश साहनी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून सांगितले होते की त्यांना वचन दिलेल्या 35 जागांऐवजी फक्त 18 जागा देण्यात येत आहेत. राहुल गांधींच्या हस्तक्षेपानंतर, राजदने 15 जागा सोडण्यास सहमती दर्शवली. सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य यांनीही वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
इतर महत्वाच्या बातम्या


















