Islamabad High Court : पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती
8 फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या फक्त एक आठवडा अगोदर इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना बेकायदेशीरपणे सरकारी भेटवस्तू विकल्याच्या आरोपाखाली 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने (Islamabad High Court) आज (1 एप्रिल) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना त्यांच्या तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणातील शिक्षेचे अपील मंजूर झाल्याने 14 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा स्थगिती मिळाली आहे. इम्रान खान यांना शिक्षेच्या स्थगितीमळे मोठा दिलासा मिळाला आहे.
भेटवस्तू विकल्याच्या आरोपाखाली 14 वर्षांची शिक्षा
8 फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या फक्त एक आठवडा अगोदर इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना बेकायदेशीरपणे सरकारी भेटवस्तू विकल्याच्या आरोपाखाली 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हेच प्रकरण पाकिस्तानमध्ये तोशाखाना म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी अनेक शिक्षा सुनावण्यात आल्याने इम्रान खान तुरुंगात आहेत. त्यांना 10 वर्षे कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे.
A Pakistani court temporarily suspended former Prime Minister Imran Khan’s 14-year jail sentence two months after he was found guilty of illegal dealings related to state gifts when he was in power https://t.co/RnwLPYZUqN
— Bloomberg (@business) April 1, 2024
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, ईदच्या सुट्टीनंतर मुख्य याचिका म्हणून युक्तिवाद आणि पुराव्यासाठी घेतले जाणाऱ्या शिक्षेवर अंतिम निर्णय होईपर्यंत या जोडप्याची शिक्षा स्थगित राहील. याबाबत पक्षाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
Finally, the kangaroo trial conducted in the Toshakhana case has been rejected. Every case, every sentence has to be immediately cancelled as the letter by brave 6 judges have proved the interference in such cases involving both Imran Khan and Bushra Bibi. We demand the immediate… pic.twitter.com/T9EIAeRgC1
— PTI (@PTIofficial) April 1, 2024
इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाने लष्करप्रमुखांशी संबंध सोडल्यानंतर देशाच्या शक्तिशाली सैन्याच्या सांगण्यावरून त्यांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. तथापि, लष्कराने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या