एक्स्प्लोर

भीमा कोरेगाव- 5 जणांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम

भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात नजरकैदेत असलेल्या पाच जणांची अद्याप सुटका झालेली नाही.

नवी दिल्ली: भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात नजरकैदेत असलेल्या पाच जणांची अद्याप सुटका झालेली नाही. आता येत्या सोमवारी याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. या पाच जणांच्या सुटकेसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, तर अटकेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र पुणे पोलिसांनी त्याला विरोध करत, अटकेतील लोक हिंसा भडकवण्याच्या कटात सहभागी होते, असा दावा केला होता. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पुणे पोलिसांना शनिवारपर्यंत संपूर्ण खटल्याचा तपशील कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले. तर याचिकाकर्त्यांनाही लेखी दस्तऐवज जमा करण्यास सांगण्यात आलं. जर पुरावे बनावट आढळल्यास खटलाच रद्द करु, असं कोर्टाने म्हटलं होतं. काय आहे प्रकरण? 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर आली. भीमा कोरेगावचा हिंसाचार हा देशात अस्थिरता पसरवण्यासाठी नक्षलवादी कट असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. तपासात पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. ज्याच्या आधारावर 28 ऑगस्टला पाच सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरनॉन गोंजाल्विस, वरवरा राव आणि अरुण परेरा यांना देशातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह पाच जणांनी या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. राजकीय हेतूने ही अटक करण्यात आली असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला. यानंतर अटक केलेल्या व्यक्तींना पोलिसांच्या रिमांडमध्ये पाठवण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली, शिवाय सर्वांना तूर्तास नजरकैदेत ठेवावं, असे आदेश दिले. कोर्टात आज काय झालं? महाराष्ट्र सरकारतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाकडे याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. त्यांनी कोर्टात पोलिसांनी जमा केलेले पुरावे सादर केले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. देशविरोधी कृत्यांचा कट उधळून लावत पोलीस मोठी शोधमोहिम राबवत आहेत. जूनमध्ये अटक केलेले लोक आणि आता पकडलेल्या लोकांचं संभाषण धक्कादायक आहे, असं तुषार मेहता म्हणाले. दुसरीकडे तक्रारकर्ते तुषार दांगुडे यांच्याकडून वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनीही याचिका फेटाळण्याची मागणी केली. हरीश साळवे म्हणाले, “हे प्रकरण देशविरोधी कटाचं आहे. जर पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्याबाबत शंका निर्माण केली जात असेल, तर सुप्रीम कोर्टाने ही सुनावणीच बंद करावी. काही लोक पोलीस तपासात अडथळे आणण्याची प्रयत्न करत आहेत. अटकेच्या कारवाईची एसआयटी चौकशीची मागणी हा त्याचाच भाग आहे. या लोकांना ना केंद्रावर, ना राज्य सरकारवर विश्वास आहे. इतकंच नाही तर त्यांना विद्यमान न्यायमूर्तींवरही विश्वास नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून निवृत्त न्यायमूर्तींकडून एसआयटीची मागणी केली जात आहे” दरम्यान, याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले. पोलीस जे दस्तऐवज संवेदनशील सांगत आहेत, त्यातील अनेक बनावट आहेत. ते आधीच मीडियात लीक करण्यात आले, असा दावा सिंघवींनी केला आहे. संबंधित बातम्या  भीमा कोरेगाव : सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी बुधवारी, तोपर्यंत 'ते' पाच जण नजरकैदेतच  'त्या' पाच आरोपींचे काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंध : पुणे पोलिस   नक्षली संबंध : पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवा : सुप्रीम कोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget