एक्स्प्लोर

Bharat bandh LIVE : पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद

शेतकर्‍यांच्या घोषणेनुसार शुक्रवारी म्हणजेच आज भारत बंद राहील. अनेक राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

Key Events
Bharat Bandh Live updates Farmer protest call India nationwide bandh against new farm laws Bharat bandh LIVE : पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद
भारत बंद

Background

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच आज शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, "दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी संघर्षाला आज 26 मार्च रोजी 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंद होईल." संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, बार संघटना, राजकीय पक्ष आणि राज्य सरकार यांच्या प्रतिनिधींनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

काय बंद आणि काय सुरु?

किसान मोर्चाने सांगितले की, पूर्ण भारत बंद अंतर्गत सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठा आणि संस्था बंद ठेवल्या जातील. सर्व छोटे-मोठे रस्ते आणि गाड्या रोखण्यात येतील. रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील. दिल्लीतही भारत बंदचा परिणाम होईल.

शेतकरी नेते दर्शन पालसिंग म्हणाले की ज्या दिल्लीत धरणे आंदोलन सुरू आहे अशा सीमा आधीच बंद आहेत. यावेळी पर्यायी मार्ग उघडण्यात आले. उद्याच्या भारत बंददरम्यान हे पर्यायी मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वांनी शांत राहून या बंदला यशस्वी करण्याचे आवाहन किसान मोर्चाने केले आहे. कोणत्याही प्रकारच्या बेकायदा वादात न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काँग्रेसचे समर्थन

शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, सीपीआयएमसह अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, बहिऱ्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी निर्णायक संघर्ष आवश्यक आहे.सध्याची शेतकरी चळवळ याच दुव्याचा भाग आहे. तीनशे शेतकरी बांधव शहीद होऊनही झोपलेल्या मोदी सरकारला उठवण्याची वेळ आली आहे. 26 मार्चला प्रस्तावित शांततापूर्ण आणि गांधीवादी भारत बंदला आमचा पाठिंबा आहे.

08:57 AM (IST)  •  26 Mar 2021

पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद

अखिल भारतीय किसान सभा संघर्ष समन्वय समिती, जन आंदोलन संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारत बंदचा नारा असून पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज पहाटे पासून कासा चारोटी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget