एक्स्प्लोर

आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान

माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.

इंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे. भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!   कोण आहे विनायक? विनायक हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे. विनायक काल भय्यू महाराजांच्या मुलीला आणण्यासाठी पुण्याला गेला होता, त्यादरम्यान भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची माहिती - सूत्र भय्यू महाराज यांची संपत्ती भय्यू महाराजांच्या संस्थेचे राज्य सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेली माहितीची अधिकृत संपत्ती याप्रमाणे - गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण मिळून १२०० एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त ८० एकर शेती शिल्लक आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा इथली शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी ऐंशी लाख मिळाले. त्याआधी बार्शी टाकळी जिल्हा अकोला इथली ८० एकर शेती विकली. तुळजापूर शहरांमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यासाठी पाच एकर जमीन विकून बावीस लाख रुपये दिले. सध्या सुजालपूर मध्यप्रदेश इथे ८० एकर शेती शिल्लक. महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत अनुदानित इथं दीड हजार विद्यार्थी शिकतात. पुणे आणि अकोला इथे यांचाही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रम आहे. शाळा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथं पाचवी ते बारावी महाविद्यालय आहे साडेतीनशे मुले शिकतात. विनाअनुदानित. तुळजापूर तालुक्यातल्या मुरता इथं पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी शाळा आहे विनाअनुदानीत साडेतीनशे मुले शिकतात. संस्थेला ८० सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत. अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल होती. संबंधित बातम्या  भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार  भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं    मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली!  भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!   हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट    नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते? 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget