एक्स्प्लोर

Bengal Elections : ममता बॅनर्जी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज, भाजपच्या शुभेन्दू अधिकारींचा नंदीग्राममध्ये रोड शो

तृणमूलच्या ममता बँनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल  करणार आहेत तर त्यांच्या विरोधातले  भाजपचे उमेदवार शुभेन्दू अधिकारी हे आज रोड शो करणार आहेत. 

Bengal Elections : पश्चिम बंगालमध्ये राजकारणातील हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर त्यांचे विरोधक उमेदवार शुभेन्दू अधिकारी आज नंदीग्राममध्ये एक रोज शो करणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण आज ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या नंदीग्राममधील प्रसिद्ध शिव मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर त्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. 

त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक उमेदवार आणि भाजपचे उमेदवार शुभेन्दू अधिकारी आज सकाळी दहा वाजता नंदीग्राममध्ये रोड शो करणार आहेत. टेंगूवा रस्त्यापासून सुरु होणारा हा रोड शो जानकीनाथ मंदिरापर्यंत जाणार आहे. त्यानंतर शुभेन्दू अधिकारील त्यांच्या नव्या निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. शुभेन्दू अधिकारी त्यांचा उमेदवारी अर्ज 12 मार्चला भरणार असल्याची माहिती आहे. 

गेली अनेक वर्षे नंदीग्रामचं प्रतिनिधित्व करणारे शुभेन्दू अधिकारी हे नुकतेच ममतांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. ममतांच्या कॅबिनेटमध्ये नंबर दोनचे मंत्री असा त्यांचा उल्लेख होत होता. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुभेन्दू हे भाजपमध्ये सामील झालेले आहेत. 

BJP Candidates List 2021: मुख्यमंत्री ममता यांच्याविरोधात शुभेन्दु अधिकारी निवडणूक लढवणार, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

''माझं अंतर्मन मला सांगत आलेलं आहे नंदीग्राम हे नेहमीच माझ्यासाठी लकी स्थान राहिलेलं आहे. माझ्यासाठी ते कायम पवित्र आहे. त्यामुळे मी नंदीग्राममधून लढलं पाहिजे. मी आमचे प्रदेशाध्यक्ष सुब्रतो बक्षी यांना विनंती करते की त्यांनी नंदीग्राममधून माझ्या उमेदवारीला परवानगी द्यावी." असं ममता नंदीग्रामच्या जाहीर सभेत म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी या सध्या कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतात. हाच त्यांचा पारपंरिक मतदारसंघ आहे.

ममतांना नंदीग्राममधून हरवूनच दाखवेन अन्यथा राजकारण सोडून देईन अशी गर्जना शुभेन्दू यांनी केली आहे. 2006 पासून शुभेन्दू इथे आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांचे वडील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तसेच शुभेन्दू यांचे दोन भाऊही राजकारणात असून त्यांचीही या भागात पकड आहे.

पश्चिम बंगाल निवडणुका 8 टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. त्यानंतर 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल.

पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठी बंडखोरी झालेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी स्वत: मैदानात उतरणार

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget