Video: टॉवरवरुन आत्महत्या करण्याचा विचार बदलला पण खाली उतरताना पाय घसरला अन् मृत्यूनं गाठलंच
मरण यायचं म्हटलं की कसंही येऊ शकतं, कुठंही येऊ शकतं. याच गोष्टीची प्रचिती बेळगावातील (Belgaum News) कागवाड पोलिस ठाण्याच्या परिसरात आली आहे.
Belgaum News Updates: मरण यायचं म्हटलं की कसंही येऊ शकतं, कुठंही येऊ शकतं. याच गोष्टीची प्रचिती बेळगावातील (Belgaum News) कागवाड पोलिस ठाण्याच्या परिसरात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum Suicide News)या घटनेची सध्या खूपच चर्चा सुरु आहे. टॉवरवर आत्महत्या करण्यासाठी चढलेल्या व्यक्तीचे जमलेल्या लोकांनी मतपरिवर्तन केलं. मात्र त्या व्यक्तीच्या नशीबात मृत्यूच लिहिला होता की काय? ती व्यक्ती टॉवर वरून खाली उतरत असताना पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला.
कर्जदारांच्या जाचाला कंटाळून एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढली. लोकांनी त्याची समजूत काढली त्यानंतर तो आत्महत्या करण्याचा विचार बदलून टॉवरवरून खाली उतरते वेळी पाय घसरून पडला गंभीर जखमी झाला. यानंतर तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाते वेळी रुग्णवाहिकेमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. सदर घटना बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगवती गावात घडली.
संजय कलगौडा पाटील (35) असे टॉवरवरून खाली पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय पाटील यांने काही खाजगी बँकातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्याची समजूत काढली. यानंतर त्यानं आत्महत्येचा विचार बदलला तरी त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे संजय टॉवरवरून खाली पडतानाचा भीषण व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सदर घटना कागवाड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली घडली आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या मृत्यूपासून लोकांनी संजय पाटीलला परावृत्त केलं होतं, शेवटी त्याला मृत्यूनं गाठलंच.
Nanded News: अन् तो आत्महत्या करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीवरच चढला
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील शेतकऱ्याने आत्महत्या करण्यासाठी थेट तहसील कार्यालय गाठलं. मुखेड तालुक्यातील कमजळगा येथील रहिवाशी असणाऱ्या सचिन वाघमारे हा शेतकरी तलाठ्याच्या आर्थिक जाचाला कंटाळून थेट मुखेड तहसील कार्यलयाच्या प्रशासकीय इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी चढला होता. दरम्यान तलाठ्याने दहा हजार रुपये घेऊनही शेतीचा फेरफार केला नसल्यामुळे आणि तलाठ्याकडून फेरफार करून घेण्यासाठी सतत पैशाची मागणी होत असल्याने शेतकऱ्याने हे शोले स्टाईल पाऊल उचलले होते. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत सबंधित शेतकऱ्याला समजावून सांगून ताब्यात घेतले