धुलिवंदनाचा राज्यभरात जल्लोष; बेळगावात अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण कार्यक्रम
देशभरात धुलिवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रंगोत्सवाचे सार्वजनिक कार्यक्रम कोरोना व्हायरसमुळे रद्द झाले असले तरी तरुणाईने वेगवेगळ्या ठिकाणी रंगोत्सवाचा आनंद लुटला.
बेळगाव : देशभरात धुलिवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रंगोत्सवाचे सार्वजनिक कार्यक्रम कोरोना व्हायरसमुळे रद्द झाले असले तरी तरुणाईने वेगवेगळ्या ठिकाणी रंगोत्सवाचा आनंद लुटला. त्याबरोबरच अश्वत्थामा मंदिरासमोर अनेक वर्षांच्या परंपरेनुसार लोटांगण घालण्याचा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक! नाशिकमध्ये धुलिवंदनाची तीनशे वर्षांपासूनची अनोखी परंपरा
शंभर वर्षांपासून अश्वत्थामा मंदिरासमोर धुलीवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची परंपरा आहे. बेळगावच्या पांगुळ गल्लीत असणारे दक्षिण भारतातील अश्वत्थामा मंदिर एकमेव आहे. संपूर्ण भारतात देखील अश्वत्थामाची मोजकीच मंदिरे आहेत. शेकडो भक्त रस्त्यावर लोटांगण घालून आपली मागणी पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. तर काही जण मागणी पूर्ण झाल्याबद्दल लोटांगण घालतात. लोटांगण घालत असताना गल्लीतील नागरिक पाणी मारत होते. काही जण रंग उडवत होते. केवळ बेळगाव नव्हे तर कर्नाटकातील अनेक भागातून, गोव्यातून आणि महाराष्ट्रातून भक्तजन अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण घालण्यासाठी आले होते.
राज्यभरात होळीनंतर धुळवडीचा उत्साह; खासदार नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी कोरकू नृत्य
जुन्या भाजी मार्केटमध्ये रेन डान्सचा आनंद युवा वर्गाने लुटला. अनेक गल्ल्यामध्ये डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत असलेले दृश्य पाहायला मिळाले. लहान मुले, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने रंगोत्सवात सहभागी झाले होते. अनेक सोसायट्यांच्या आवारात देखील रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथे सगळ्या वयोगटातील व्यक्ती रंगोत्सवात सहभागी झाले होते. वाहनावरून रंगाचे फुगे उडवत जाणारी तरुणाई पाहायला मिळाली. रंगोत्सवानिमित्त शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा