एक्स्प्लोर
साधना सिंह यांचा शिरच्छेद करा, 50 लाख मिळवा, बसपा नेत्याची घोषणा
भाजपच्या आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 50 लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बसपाचे माजी आमदार विजय यादव यांनी केली आहे. साधना सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना मायावतींची तुलना तृतीयपंथीयांशी केली होती.
![साधना सिंह यांचा शिरच्छेद करा, 50 लाख मिळवा, बसपा नेत्याची घोषणा Beheaded Sadhna Singh, get 50 lakhs, says BSP Leader Vijay yadav साधना सिंह यांचा शिरच्छेद करा, 50 लाख मिळवा, बसपा नेत्याची घोषणा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22071926/index.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 50 लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बसपाचे माजी आमदार विजय यादव यांनी केली आहे. साधना सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना मायावतींची तुलना तृतीयपंथीयांशी केली होती.
समाजवादी पार्टी आणि बसपाची आघाडी झाल्याने भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे, म्हणून ते बसपा अध्यक्ष मायावतींवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत, असं विजय यादव म्हणाले. त्यामुळे जो कोणी भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करेल त्याला 50 लाखांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
विजय यादव यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्यांना पळवून मारु, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांच्या या घोषणेमुळे भाजप आणि बसपामधील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे.
साधना सिंह यांनी मायावतींची तृतीयपंथीयांशी तुलना केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु झाली होती. या टीकेनंतर सिंह यांनी माफीनामा सादर केला. यामध्ये सिंह यांनी म्हटले होते की, 'मी केलेल्या भाषणात मला कोणालाही दुखवायचे नव्हते. माझ्या भाषणातून जर कुणाला वाईट वाटले असेल अथवा दुःख झाले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते."
सिंह यांच्या बेताल वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले होते. या वक्तव्यावरुन साधना सिंह यांना बहुजन समाज पार्टीने नोटीस बजावली होती. याबरोबरच महिला आयोगानेही या वक्तव्याची दखल घेऊन साधना सिंह यांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)