एक्स्प्लोर
Advertisement
मुकेश अंबानींची दिवसाची कमाई 300 कोटी रुपये
एसपी हिंदुजा अँड फॅमिली, एलएन मित्तल अँड फॅमिली आणि अझिम प्रेमजी या तिघांची मिळून जेवढी संपत्ती आहे, त्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या अनिल अंबानी यांची आहे.
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. शिवाय, त्यांची दिवसाची कमाई सुद्धा 300 कोटींवर पोहोचली असून, गेल्या एक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे भाव सुद्धा 45 टक्क्यांनी वाढले आहेत. बार्क्लेज् हुरुन इंडियाने भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केलीय.
एसपी हिंदुजा अँड फॅमिली, एलएन मित्तल अँड फॅमिली आणि अझीम प्रेमजी या तिघांची मिळून जेवढी संपत्ती आहे, त्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या मुकेश अंबानी यांची आहे. गेल्या सात वर्षांपासून मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलं आहे.
>> एसपी हिंदुजा अँड फॅमिली यांची संपत्ती - 1,59,000 कोटी रुपये
>> एलएन मित्तल अँड फॅमिली यांची संपत्ती - 1,14,500 कोटी रुपये
>> अझिम प्रेमजी यांची संपत्ती - 96,100 कोटी रुपये
>> आणि एकट्या मुकेश अंबानी यांची संपत्ती - 3,71,000 कोटी रुपये
एक हजार कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तींची यादी बार्क्लेज् हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. याच यादीत 2017 साली 617 श्रीमंत व्यक्तींचा समावेश होता, आता हाच आकडा 831 वर पोहोचला आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत कोण?
1. मुकेश अंबानी - 3,71,000 कोटी रुपये
2. एसपी हिंदुजा अँड फॅमिली - 1,59,000 कोटी रुपये
3. एलएन मित्तल अँड फॅमिली - 1,14,500 कोटी रुपये
4. अझीम प्रेमजी - 96,100 कोटी रुपये
5. दिलीप संघवी - 89,700 कोटी रुपये
6. उदय कोटक - 78,600 कोटी रुपये
7. सायरस एस. पूनावाला - 73,000 कोटी रुपये
8. गौतम अदानी अँड फॅमिली - 71,200 कोटी रुपये
9. सायरस मिस्त्री - 69,500 कोटी रुपये
10. शापूर मिस्त्री - 69,400 कोटी रुपये
या यादीत एक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे, सन फार्माचे दिलीप संघवी हे पाचव्या स्थानावर घसरले आहेत. त्यांच्या सुझलॉन कंपनीचे शेअर्स सातत्याने पडत आहेत. हा तोटा त्यांच्या एकूण संपत्तीवर प्रभाव टाकत असल्याचे दिसून येतेय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement