एक्स्प्लोर

मल्ल्याचा 4 हजार कोटींचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला

नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्याने दिलेला प्रस्ताव बँकांनी फेटाळला आहे.  30 सप्टेंबरपर्यंत 17 बँकांना 4 हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मल्ल्याकडून बँकांपुढे ठेवण्यात आला होता. मात्र तो बँकांनी फेटाळला आहे.   30 मार्चला मल्याच्या वकिलांनी कोर्टात अर्ज करून 4 हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र बँकांना मल्ल्याकडून अधिक चांगला प्रस्ताव अपेक्षित आहे असं आज कोर्टात सांगण्यात आलं.   येत्या दहा दिवसात मल्ल्यानं आपल्याकडील एकूण संपत्तीचा आकडा कोर्टापुढे जाहीर करुन मोठी रक्कम जमा करावी. त्यानंतरच बँकांशी चर्चा होऊ शकेल असे आदेश कोर्टानं मल्ल्याच्या वकिलांना दिले आहेत.   'किंगफिशर एअरलाईन्स'चा मालक असलेल्या विजय मल्ल्यावर 17 बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीकडून मल्ल्याची चौकशी सुरू असून अटक होण्याच्या भीतीनं तो देशातून पळून गेला आहे.   नेमका आकडा किती? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्ल्या यांनी दिलेल्या कर्जफेडीच्या प्रस्तावात एकूण 6903 कोटी रूपयाचं कर्ज असल्याचं मान्य केलंय, त्यापैकी चार हजार कोटी रूपये ते सप्टेंबर पर्यंत देण्यास तयार आहेत. मात्र बँकाच्या मते ही रक्कम तब्बल नऊ हजार कोटी रूपये आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रस्तावानुसार ते फक्त मुद्दल गृहित धरत आहेत. आता त्यावरील थकीत आणि नियमित व्याज मिळून ही रक्कम तब्बल नऊ हजार कोटींपर्यंत जातेय.   मल्ल्या देश सोडून पळाला   17 बँकांकडून 9 हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले उद्योगपती विजय मल्ल्यांनी देश सोडला असल्याची माहिती 9 मार्चला सरकारने कोर्टात दिली.  अटॉर्नी जनरल मुकूल रहोतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. यावेळी लंडनमधील भारतीय दूतावासतर्फे विजय मल्ल्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.   स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने मल्ल्या आणि किंगफिशर यांना कर्ज पुरवठा केलेल्या सात हजार 800 कोटी रूपयांमध्ये जवळपास 1600 कोटी रूपये एकट्या स्टेट बँकेने दिले आहेत. जानेवारी 2012 पासून मल्ल्या यांच्या किंगफिशरने कर्जांचे हफ्ते थांबवले आहेत.   किंगफिशरला कर्ज पुरवठा करणाऱ्या 17 बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, यूको बँक आणि देना बँकेचा समावेश आहे.   जेट एअरवेजच्या फ्लाईटने लंडनला रवाना   विजय मल्ल्या 2 मार्चला जेट एअरवेजच्या ‘9W 122’ या दुपारी दीड वाजताच्या फ्लाईटने दिल्लीहून लंडनला रवाना झाले. एअरपोर्टवर चेक इनवेळी मल्ल्या यांच्याकडे 7 बॅग होत्या, अशी माहिती मिळते आहे.

संबंधित बातम्या:

कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशातून पळाले!

विजय मल्ल्यांचा पाय खोलात, बँकांची सुप्रीम कोर्टात धाव 

विजय मल्ल्यांना अटक होणार की नाही? आज निर्णयाची शक्यता

दिल्ली टू लंडन, फ्लाईट नंबर 9W 122... विजय मल्ल्या भारताबाहेर!

स्टेट बँकेकडून विजय मल्ल्यांच्या अटकेची मागणी, देश सोडणार असल्याचा संशय

भाजपमुळेच विजय मल्ल्या पळाले : राहुल गांधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget