एक्स्प्लोर
Advertisement
कार्डद्वारे पेट्रोल खरेदीवरील वाढीव सेवा शुल्क बँकांकडून तूर्तास मागे
मुंबई : पेट्रोल पंपावर कार्डद्वारे पेट्रोल खरेदीवर अधिकचा सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांनी शुक्रवारपर्यंत मागे घेतला आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत क्रेडिट आणि डेबिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेल्या पेट्रोलपंपवाल्यांनी आता माघार घेतली आहे. बँकांचा पुढील निर्णय येईपर्यंत डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या हस्तक्षेपानंतर अधिकचा सेवा शुल्क आकारण्याचा निर्णय बँकांनी मागे घेतल्याची माहिती मिळते आहे.
एचडीएफएसी आणि अॅक्सिस बँकेने अधिकच शुल्क आकारल्यानं ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन आक्रमक पवित्रा घेत, डेबिट, क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला होता.
डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या इंधनावर 0.25 टक्के पासून 1 टक्क्यापर्यंत चार्ज आकारलं जाणार होतं. त्यामुळे कुठल्याही बँकेच्या केड्रिट आणि डेबिट कार्डद्वारे पेट्रोल देणार नाही, अशी भूमिका पेट्रोल असोसिएशननं घेतली होती. अधिकच्या शुल्कामुळे डिलर्सच नुकसान होत असल्याचं फामपेडाचंही म्हणणं आहे.
संबंधित बातमी : पेट्रोलपंपावर मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारणे बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement