(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bakrid 2023 : देशभरात बकरी ईदचा उत्साह, प्रत्येक लाईव्ह अपडेट पाहा एका क्लिकवर...
Eid al-Adha 2023 : आज 29 जून रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-अजहा हा सण देशभरात साजरा केला जात आहे.
LIVE
Background
Eid al-Adha 2023 : आज हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र दिवस आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-अजहा हा सण आज 29 जून रोजी देशभरात साजरा केला जात आहे. देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून जगप्रसिद्ध बालाजी मंदिर असलेल्या देऊळगाव राजा आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील मुस्लिम बांधवांनी या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. निर्णय घेतल्यावर समाज बांधवांनी पोलिस प्रशासनास निर्णयच पत्र देऊन कळविण्यात आलं आहे. या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वच स्तरातून स्वागत होतं आहे.
आज मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अजहा हा सण साजरा केला जाणार आहे. ईद उल अजहाला बकरी ईद असंही म्हणतात. या दिवशी बकऱ्याचा कूर्बानी दिली जाते. ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी का दिली जाते ते जाणून घ्या. ईद-उल-फित्र म्हणजेच 'मिठी ईद' ईद-उल-अजहाच्या दोन महिने आधी साजरी केली जाते. त्यानंतर दोन महिन्यांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाते.
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. या कुर्बानीनंतर जे मांस मिळतं त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो. कुर्बानी तीन भागांत व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते.
इस्लामिक धर्माच्या मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम हे अल्लाहचे पैगंबर असल्याचं म्हटलं जातं. हजरत इब्राहिम हे सदैव लोककल्याणात मग्न राहिले. त्यांनी आयुष्याचा अधिक काळ समाजसेवेत घालवला. मात्र, अनेक वर्ष त्यांना मुलं झालं नाही. यानंतर त्यांनी अल्लाहची ईबादत केली. त्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्याचं नाव इस्माईल ठेवण्यात आलं. मुलाच्या जन्मानंतर, इब्राहिम यांना एक स्वप्न पडलं. अल्लाहने स्वप्नात त्यांना कुर्बानी देण्याची आज्ञा दिली. त्यांनी आधी प्रथम उंटाचा बळी दिला. यानंतर त्यांना पुन्हा एक स्वप्न पडलं आणि त्याला आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश देण्यात आला.
इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिमसाठी यांच्यासाठी अल्लाहचा आदेश होता की, त्यांना प्रिय वस्तूची कुर्बानी द्यावी लागेल. यानंतर हजरत इब्राहिम यांनी आपल्या प्रिय मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक मान्यतेनुसार, अल्लाहच्या आदेशानुसार पुत्र इस्माईलची कुर्बानी देण्यापूर्वी हजरत इब्राहिम यांनी जड अंतःकरणाने डोळे बांधले आणि त्याचा गळ्यावर चाकू ठेवला. मात्र, त्यांनी कुर्बानीसाठी चाकू वर उगारताच अचानक मुलगा इस्माईल यांच्याऐवजी एक डुंबा (बकरी) तेथे आला. हजरत इब्राहिम यांनी डोळ्याची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा इस्माईल सुरक्षित होता आणि त्यांनी बकऱ्याची कुर्बानी दिली होती.
इस्लामिक मान्यतेनुसार, ही केवळ अल्लाहची परीक्षा होती. अल्लाहच्या आदेशानुसार हजरत इब्राहिम आपल्या मुलाचीही कुर्बानी देण्यास तयार झाले. इब्राहिम यांचा विश्वास आणि त्याग पाहून अल्लाहने त्यांना पैगंबर बनवलं. तेव्हापासून बोकडाचा बळी देण्याची परंपरा सुरू झाली. दरवर्षी बकरीदची तारीख धुल हिज्जा महिन्यात चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. इस्लामिक कालगणनेनुसार, धूल हिज्जा हा इस्लामचा 12 वा महिना आहे.
Bakri Eid 2023 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उत्साहात बकरी ईद साजरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजेबाग येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. यावेळी समाजात एकता कायम राहावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली.
नाशिक : नांदगावात बकरी ईद उत्साहात साजरी
- ईद-उल-जुहा तथा बकरी ईद नांदगावात उत्साहात साजरी...
- शहरातील सर्व मशिदीत करण्यात आले नमाज पठण...
- मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले...
- धर्मगुरू मौलाना मुफ्ती फईम यांनी नमाज पठणानंतर केले वैचारिक प्रबोधन...
- नमाज पठणनंतर एकमेकांना आलिंगन देत दिल्या ईदच्या शुभेच्छा...
मालेगाव : बकरी ईदच्या निमित्ताने मालेगावात मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा
- बकरी ईदच्या निमित्ताने मालेगावात मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा..
- मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.
- मालेगाव शहरातील विविध ईदगाह मैदान आणि मशिदींमध्येही नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते ..
- आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती...
- जामा मशिदीचे पेश इमाम तथा आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले..
विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच - हायकोर्ट
विनापरवानगी रहिवासी संकुलात कुर्बानी देणं चुकीचंच - हायकोर्ट
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश
नागपाडा पोलिसांना याप्रकरणी तातडीनं कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे निर्देश जारी
रहिवासी संकुलात खुल्या जागेत कुर्बानी देण्यास विरोध करणारी हायकोर्टात याचिका