एक्स्प्लोर

Bachchu Kadu: लोकसभेत बच्चू कडू यांची वेगळी भूमिका, आता थेट शरद पवार यांच्याशी चर्चा

Bachchu Kadu: महायुती सरकारमधील अनेक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले आहेत.

Bachchu Kadu: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमधील अनेक नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले आहेत. साडे आठ वाजता मोदीबागेत घेणार शरद पवारांची (Sharad Pawar) भेट होणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहेत का अशा चर्चा आता या भेटीमुळे सुरू झाली आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) शिवसेना पक्षफुटीच्या वेळी एकनाथ शिंदेंसोबत गेले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराला थेट विरोध केला होता. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेत त्यांनी थेट भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार केला होता. आपल्या प्रहार संघटनेच्या वतीने त्यांनी आपला उमेदवार उभा केला होता. लोकसभा निवडणुकीत कडू (Bachchu Kadu) यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आला होता. पण त्याला यश आले नाही. शेवटी अमरवाती या जागेवर भाजपाच्या उमेदवारा विजय झाला. तेव्हापासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर वेळोवेळी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) हे आज भेटीसाठी मोदी बागेत आल्यानंतर त्यांनी या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शेतकरी, दिव्यांगासाठी वेळ पडली तर काहीही करू असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

भेटीदरम्यान कोणत्या गोष्टींवर चर्चा?

यावेळी बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, ही भेट आधीच ठरलेली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी, मजुरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. अंपगाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 1 सप्टेंबर पर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल. ⁠याच मुद्द्यांवर आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत आहे. मला अंपग, शेतकरी, मजुर यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. या मुद्यावरूनच कोणाबरोबर जायचे याचा निर्णय होईल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.  

आम्ही काल जे मुद्दे मांडले त्यावरती चर्चा मी शरद पवारांशी करणार आहे. 1 सप्टेंबर पर्यंत महायुतीला वेळ दिला आहे. त्यांच्यासोबत बाकी कोणते पक्ष या मुद्द्यांवर चर्चा करतील त्यांचे मत सांगतील, त्यासाठी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेत आहोत, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. नाराजीबाबतच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, मी कोणावरती नाराज नाही. राणा दाम्पत्याचा बरोबर असलेल्या वादाचा येथे काहीही संबंध नाही.

आजच्या बैठकीत शरद पवारांनी ऑफर दिली तर?

आजच्या शरद पवारांसोबत होणाऱ्या बैठकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) ऑफर दिली तर या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. सरकारला वेळ देणार आहे, शरद पवारांशी चर्चा करणार आहे, शेतमजूर, दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी आम्ही काहीही करू असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers' Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाम, Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
Phaltan Case: डॉक्टरने जीवन संपवलं की हत्या?', अंधारेंची Rupali Chakankar यांच्या राजीनाम्याची मागणी
Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंचा महाएल्गार, आंदोलनावर ठाम, सरकारसमोर पेच
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 29 OCT 2025 : ABP Majha
Maharashtra Rains: 'आधीची नुकसान भरपाई नाही, आता नवं संकट', Beed मध्ये शेतकरी हवालदिल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
मुंबईतील हिवाळ्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक
मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावर उच्चस्तरीय आढावा बैठक
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूला व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
Embed widget